जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / भारतीय रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

उमेदवाराने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली नसावी.

उमेदवाराने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली नसावी.

नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त नसावं. निवृत्त झालेले कर्मचारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून : रेल्वे मंत्रालयाने आपल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीची संधी दिली आहे. आपल्या देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वे वाहतुकीचा हा पसारा सांभाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात आणि कुशल मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठीच रेल्वेने कर्मचारी भरती सुरू केली आहे. भारतीय रेल्वेने ‘स्टाफ’ पदासाठी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. भारतीय रेल्वे 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, दिलेल्या पदासाठी एकूण 16 रिक्त जागा आहेत. स्टाफमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त नसावं. निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्ड लेटरनुसार मासिक वेतन दिलं जाईल. ‘स्टडी कॅफे’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पोस्टचं नाव आणि संख्या: भारतीय रेल्वे 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, विविध विभागांत स्टाफ पदासाठी एकूण 16 रिक्त जागा आहेत. सविस्तर माहितीसाठी इच्छुक अधिकृत अधिसूचना वाचू शकतात. वेतन: स्टाफपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्ड लेटरनुसार मासिक वेतन दिलं जाईल. वयोमर्यादा: भारतीय रेल्वे 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, स्टाफमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त नसावं. पात्रता निकष: भारतीय रेल्वे सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी स्टाफच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. 1) उमेदवाराने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली नसावी. उमेदवाराला जबरदस्ती सेवानिवृत्त किंवा काढून टाकलेलं नसावं. 2) जे कर्मचारी सेफ्टी संबंधित सेवानिवृत्ती योजना किंवा सुरक्षा कर्मचार्‍यांसाठी गॅरंटीड एम्प्लॉयमेंट (LARGESS) साठी असलेल्या सक्रिय सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झाले आहेत, ते या नोकरीसाठी पात्र नाहीत. 3) रेल्वेतील वैद्यकीय नियमांनुसार, ज्या श्रेणीसाठी अर्ज केला जातो त्या वर्गासाठी पॅनेल केलेले कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असणं अनिवार्य आहे. Mumbai News : रायगडावर शिवरायांचं चांदीचं शिल्प, कुणी केलं तयार? पाहा हा VIDEO अर्ज कसा करावा? भारतीय रेल्वे 2023 भरतीच्या अधिसूचनेमध्ये उल्लेख केल्यानुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरू शकतात आणि हा भरलेला अर्ज वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी उत्तर रेल्वे, डीआरएम कार्यालय मुरादाबाद यांना पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2023 आहे. या तारखेनंतर मिळालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रेल्वेचे जे सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा नोकरी करण्यास इच्छुक आहेत ते या संधीचा लाभ घेऊ शकतात. त्यांना वयाच्या 64व्या वर्षापर्यंत पुन्हा नोकरी करता येऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात