Home /News /technology /

Facebook डाउन झाल्याने मोठा फटका, काही तासात झुकेरबर्ग यांचं 5,21,90,70,50,000 रुपयांचं नुकसान

Facebook डाउन झाल्याने मोठा फटका, काही तासात झुकेरबर्ग यांचं 5,21,90,70,50,000 रुपयांचं नुकसान

सोमवारी WhatsApp, Facebook, Instagram हे फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने हा मोठा फटका बसला.

    नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : Facebook चे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची वैयक्तिक संपत्ती काही तासांत सुमारे 7 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. भारतीय रुपयानुसार ही किंमत 5,21,90,70,50,000 रुपये इतकी होते. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नंबर घसरला आहे. सोमवारी WhatsApp, Facebook, Instagram हे फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने हा मोठा फटका बसला. फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने फेसबुकचा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरला आणि सप्टेंबरच्या मध्यापासून आतापर्यंत सुमारे 15 टक्के कमी आली. सोमवारी स्टॉक स्लाइडनुसार, झुकेरबर्ग यांची संपत्ती 120.9 बिलियनपर्यंत खाली आली आणि ते बिल गेट्स यांच्या खाली 5व्या क्रमांकावर आले. 13 सप्टेंबरपासून त्यांनी जवळपास 19 अब्ज संपत्ती गमावली आहे, ज्याची किंमत सुमारे 140 बिलियन डॉलर्स होती. 13 सप्टेंबर रोजी वॉल स्ट्रीट जर्नलने Cache वर आधारित काही सीरिज प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ज्यात फेसबुकला त्यांच्या इतर सोशल मीडियामधील विविध प्रकारच्या समस्यांबद्दल माहिती होती असं सांगण्यात आलं आहे. इस्टाग्राममुळे तरुणींच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि जानेवारीमधील चुकीची माहिती याबाबतचीही माहिती फेसबुकला असल्याचं, या सीरिजमध्ये सांगण्यात आलं. याबाबत उत्तर देताना फेसबुकने सांगितलं, की राजकीय परिस्थितीसह त्यांच्या उत्पादनांसमोरिल समस्या गुंतागुंतीच्या असून या केवळ तंत्रज्ञानामुळे उद्भवलेल्या नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सोमवारी रात्री 8.30 नंतर Whatsapp, Facebook आणि Instagram या फेसबुक संचलित तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कनेक्टिव्हिटी अचानक गेली. भारतातल्या अनेक यूजर्सना facebook आणि instagram वापरतानाही अडचणी येत होत्या. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्याने फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Facebook, Tech news

    पुढील बातम्या