मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवा फोन घेताय? लाँच होणार 3 जबरदस्त Smartphones, पाहा किंमत आणि फीचर्स

नवा फोन घेताय? लाँच होणार 3 जबरदस्त Smartphones, पाहा किंमत आणि फीचर्स

नोव्हेंबर महिन्याच्या उरलेल्या काही दिवसांत जगभरात अनेक कंपन्यांचे नवे स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या उरलेल्या काही दिवसांत जगभरात अनेक कंपन्यांचे नवे स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या उरलेल्या काही दिवसांत जगभरात अनेक कंपन्यांचे नवे स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या बऱ्याच उलाढाली होत असताना दिसत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या उरलेल्या काही दिवसांत जगभरात अनेक कंपन्यांचे नवे स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. ZTE Axon 30 या स्मार्टफोनची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. हा फोन आता लाँच होण्याची शक्यता आहे. हा फोन तब्बल 18 GB रॅमचा आहे. त्याशिवाय Redmi Note 11T 5G आणि Vivo Y76 हे स्मार्टफोन्सदेखील याच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

ZTE Axon 30 -

25 नोव्हेंबर रोजी ZTE Axon 30 हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये पिक्सेल रिझॉल्युशनचं फीचर देण्यात आलं आहे. त्याशिवाय या फोनमध्ये 6.67 इंची FHD+ AMOLED डिस्प्लेही आहे. या फोनच्या स्क्रीनचं रिझॉल्युशन 1080×2400 पिक्सेल्स एवढं आहे. हा फोन तब्बल 18 GB रॅमचा आहे.

काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

Vivo Y76 5G -

Vivo Y76 5G या फोनचा 8 GB RAM आणि 128 GB इंटर्नल स्टोअरेज क्षमतेचा वेरिएंट लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत CNY 1799 एवढी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा फोन जवळपास 20,800 रुपयांच्या आसपास उपलब्ध होऊ शकेल. या फोनच्या 8 GB RAM आणि 256 GB इंटर्नल स्टोअरेज वेरिएंटची किंमत CNY 1999 एवढी आहे. भारतीय रुपयांनुसार याची किंंमत सुमारे 23,200 रुपये असेल.

हा फोन 26 नोव्हेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. Vivo Y76 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंची FHD+ LCD डिस्प्ले असेल. त्याचा रिफ्रेश रेट 60Hz एवढा असेल. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल्सचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा असेल. या फोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा असेल.

Moto G200 : स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा एक नवा स्मार्टफोन

Redmi Note 11T 5G -

30 नोव्हेंबर 2021 रोजी हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. Redmi Note11 5G या फोनला 6.6 इंची FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि रिफ्रेश रेट 90Hz एवढा असेल.

First published:

Tags: Smartphones, Tech news, Xiaomi redmi