नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या या जगात ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स मंनोरंजनासह पैसे कमावण्याचीही संधी देत आहेत. YouTube जगातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यामुळे जगभरातील अनेक क्रिएटर्सला कमाईची संधी निर्माण झाली आहे. भारतात असे अनेक क्रिएटर्स आहेत जे आपल्या कंटेंट आणि व्ह्यूअरशिपमधून मोठी कमाई करतात. असाच एक यूट्यूबर Bhuvan Bam याचं BB ki Vines नावाचं यूट्यूब चॅनेल पॉप्युलर आहे. केवळ यूट्यूबवरुन होते 22 कोटींची कमाई - भुवन बामने BB ki Vines नावाने एक यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं, ज्यात कॉमेडी कंटेंट दाखवला जातो. केवळ आपल्या यूट्यूब चॅनेलमुळे भुवनचं नेट वर्थ 22 कोटी रुपये आहे. नुकतंच भुवन बाम देशातील पहिला असा यूट्यूबर बनला आहे, ज्याने यूट्यूबवर 20 मिलियन सब्सक्राइबर्सचा आकडा पार केला आहे.
तुमच्या कामाची बातमी! YouTube वर व्हिडीओ पाहताना अशा ब्लॉक करा जाहिराती; पाहा सोपी ट्रिक
दर महिन्याला इतकी होते कमाई - रिपोर्ट्सनुसार, भुवन बाम महिन्याला 95 लाख रुपये कमावतो, ज्यात स्पॉन्सरशिप्सही सामिल आहेत. techtofacts.com च्या एका रिपोर्टनुसार, भुवन Mivi ब्रँडचा अॅम्बेसेडर आहे, ज्यांच्याकडून त्याला दरवर्षी चार कोटी रुपये मिळतात. Myntra अॅम्बेसेडर रुपात तो वर्षाला 5 कोटी रुपये कमावतो. त्याशिवाय भुवन बाम Arctic Fox, Beardo, Lenskart, Mivi, Tissot आणि Tasty Treats या ब्रँड्सचं एन्डॉर्समेंटही करतो.
YouTube वर छोटे व्हिडीओ बनवून करता येणार मोठी कमाई, कंपनीची घोषणा
भुवन बामने त्याच्या YouTube Channel सह अनेक शॉर्ट फिल्म्स आणि म्यूजिक व्हिडीओमध्येही काम केलं आहे. त्याशिवाय याची नवी वेबसीरिज ढिंढोरा यूट्यूबवर रिलीज होणार आहे.