जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या कामाची बातमी! YouTube वर व्हिडीओ पाहताना अशा ब्लॉक करा जाहिराती; पाहा सोपी ट्रिक

तुमच्या कामाची बातमी! YouTube वर व्हिडीओ पाहताना अशा ब्लॉक करा जाहिराती; पाहा सोपी ट्रिक

तुमच्या कामाची बातमी! YouTube वर व्हिडीओ पाहताना अशा ब्लॉक करा जाहिराती; पाहा सोपी ट्रिक

YouTube वर व्हिडीओ सुरू असताना मात्र मध्येच येणाऱ्या जाहिराती अतिशय त्रासदायक वाटतात. परंतु आता एका ट्रिकद्वारे यावर मार्ग काढता येऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 जुलै : यूट्यूब (YouTube) मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी व्हिडीओ साईट आहे. यूट्यूबवर विविध प्रकारचा कंटेंट पाहता येतो. इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटशिवाय यूट्यूबवर विविध वेबसीरिज, गाणी, बातम्या, चित्रपट असा मोठ्या प्रमाणात हवा तो कंटेट, हवी ती माहिती पाहता येते. व्हिडीओ सुरू असताना मात्र मध्येच येणाऱ्या जाहिराती अतिशय त्रासदायक वाटतात. परंतु आता एका ट्रिकद्वारे यावर मार्ग काढता येऊ शकतो. यूट्यूब व्हिडीओ पाहताना मध्येच येणाऱ्या जाहिराती (Ads) ब्लॉक (Ads Block) करता येऊ शकतात. YouTube वर कशा ब्लॉक कराल जाहिराती? सर्वात आधी लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर गुगल क्रोम (Google Chrome) ओपन करा. त्यानंतर Adblocker Extension Chrome सर्च करा. एक नवी विंडो दिसेल. त्यात AdBlock — best ad blocker – Google Chrome दिसेल. त्यावर क्लिक करा.

(वाचा -  UIDAI Alert! तुमचं Aadhaar Card बनावट तर नाही ना? असं तपासा )

त्यानंतर नवी विंडो ओपन होईल, ज्यात Add to Chrome लिहिलेलं दिसेल. यावर क्लिक करा, एक नवीन फाईल डाउनलोड होईल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर Google Chrome बंद करा. त्यानंतर पुन्हा एकदा ओपन करा. (वाचा -  ना ब्लू टीक, ना मेसेज रीड झाल्याचं समजणार; WhatsApp चं नवं फीचर असं करेल काम ) आता गुगल क्रोमच्या URL बारमध्ये एक Extension दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे AdBlock-best ad blocker दिसेल. त्यावर क्लिक करा. आता YouTube वर दिसणाऱ्या जाहिराती ब्लॉक होतील. अशाप्रकारे जाहिराती ब्लॉक केल्यानंतर युजरला कोणत्याही अडथळ्याशिवाय यूट्यूब व्हिडीओ पाहता येतील. तसंच, युजर्स YouTube Subscription ही घेऊ शकतात. त्यामुळे युजर्सला जाहिराती यूट्यूब व्हिडीओमध्ये जाहिराती दिसणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात