नवी दिल्ली, 13 एप्रिल : नवा स्मार्टफोन घेताना जवळपास सर्वच जण मोठा विचार करतात. फोनमध्ये काय फीचर्स असतील, कॅमेरा, बॅटरी, फोनची साइज अगदी फोनचा कोणता रंग हवा हेदेखील विचारात घेतलं जातं. पण तुम्ही कोणत्या रंगाचा स्मार्टफोन घेता यावर तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, हे समजू शकतं. रंगासंबंधी असलेल्या कलर सायकोलॉजिस्ट मॅथ्यू यांनी वेगवेगळ्या रंगांशी संबंधित पर्सनॅसिटी ट्रेट्स (Traits) बाबत अर्थात वैशिष्टांबाबत सांगितलं आहे. आपण कोणत्या रंगाच्या स्मार्टफोनची निवड करतो यावरुन आपण खऱ्या आयुष्यात कसे आहोत आपला स्वभाव कसा आहे, हे समजू शकतं.
काळा (Black) -
मॅथ्यूनुसार, जे लोक काळ्या रंगाचा स्मार्टफोन खरेदी करणं पसंत करतात त्यांच्यात गूढता, गंभीरता, पॉवर आणि प्रोफेशनलिज्मचे गुण असतात. काळ्या रंगाचा फोन खरेदी करणारे लोक प्रायव्हसीमध्ये विश्वास ठेवणारेही असू शकतात. अशा लोकांमध्ये कठीण परिस्थितीचा उत्तम प्रकारे सामना करण्याची शक्ती असते.
पांढरा रंग (White) -
मॅथ्यूनुसार, जर तुम्ही स्मार्टफोन निवडला असेल, तर तुम्हाला साफ-सफाई, स्वच्छता ठेवण्याची आवड असते. तुम्ही लोकांना जज करत नाही, लोकांचं म्हणणं मनापासून ऐकता. तुमचं स्टँडर्डदेखील उंची असतं. पांढरा रंग साधेपणा आणि शांततेचं प्रतिक असतं, तेच तुमचा स्वभावही सांगतो.
लाल (Red) -
सर्वसाधारणपणे लोक लाल रंगाचा स्मार्टफोन खरेदी करत नाहीत. पण तुमच्याकडे लाल रंगाचा फोन जसं Red iPhone असेल किंवा इतर कोणता फोन तर तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांना लोकांशी बोलायला आवडतं. अशा लोकांना इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सवय असते. अशा लोकांमधअये लालचीपणा, आक्रमकता, घाई-गडबड, स्पर्धेची भावना असू शकते.
निळा (Blue) -
निळ्या रंगाच्या स्मार्टफोनचा वापर करणारे लोक शांत मानले जातात. या लोकांना अटेन्शन आवडत नाही. हे लोक अतिशय चिंतन करतात, जीवनात सावध राहतात आणि आपले सर्व निर्णय विचार करुन घेतात. मॅथ्यूनुसार, निळ्या रंगाचा स्मार्टफोन वापरणारे लोक अनोखे असतात आणि त्यांच्यात क्रिएटिव्ह टॅलेंटही असू शकतं.
गोल्ड (Gold) -
जे लोक गोल्ड अर्थात सोनेरी शेड असलेला स्मार्टफोन वापरतात ते अतिशय दयाळू मानले जातात. तसंच त्यांना मोह-माया, पैशांची ओढ असते. ते किती पैसे कमावतात आणि समाजात त्यांचं काय स्थान आहे याकडे ते लक्ष देऊन असतात. ते किती यशस्वी आहेत, किती पैसा आहे हे त्यांच्या आसपासच्या लोकांना कळावं असंही त्यांना वाटू शकतं. तसंच जे गोल्ड रंगाचा स्मार्टफोन वापरतात त्यांना लक्झरी वस्तूही आवडतात असंही मॅथ्यूनुसार सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news