मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

PhonePe युजर्सला मोठा झटका, आता मोबाइल रिचार्ज करणं महागणार

PhonePe युजर्सला मोठा झटका, आता मोबाइल रिचार्ज करणं महागणार

आता डिजीटल पेमेंट App फोनपेद्वारे मोबाइल रिचार्ज (Mobile Recharge) करणं महागणार आहे.

आता डिजीटल पेमेंट App फोनपेद्वारे मोबाइल रिचार्ज (Mobile Recharge) करणं महागणार आहे.

आता डिजीटल पेमेंट App फोनपेद्वारे मोबाइल रिचार्ज (Mobile Recharge) करणं महागणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : अनेक जण मोबाइल-डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, पाणी-विज बिल भरण्यासाठी, ग्रॉसरी स्टोर्समधून सामान खरेदी करण्यासाठी, गॅस सिलेंडर बुकिंग किंवा काही ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी फोनपे (PhonePe) App चा वापर करतात. पण आता डिजीटल पेमेंट App फोनपेद्वारे मोबाइल रिचार्ज (Mobile Recharge) करणं महागणार आहे.

PhonePe ने काही युजर्सकडून मोबाइल रिचार्जसाठी 1 ते 2 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फीस (प्लेटफॉर्म फीस/कन्विनियन्स फीस) चार्ज करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही पेमेंट मोडद्वारे (यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फोनपे वॉलेट) रिचार्ज केल्यानंतर हा एक्स्ट्रा चार्ज लागतो आहे.

कंपनीचा खास प्रयोग -

कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जे लोक या प्रयोगाचा हिस्सा आहेत, त्यांच्यासाठी 50 रुपये ते 100 रुपयांपर्यंतच्या ट्रान्झेक्शनसाठी 1 रुपया आणि 100 रुपयांहून अधिक ट्रान्झेक्शनसाठी 2 रुपये फी आहे. हा एक स्मॉल बेस प्रयोग आहे. अधिकांश युजर्सकडून शक्यतो 1 रुपये फीस घेतली जाते. याबाबत अद्याप पूर्णपणे स्पष्टता देण्यात आलेली नाही.

PhonePe वर खरेदी करता येणार इन्शोरन्स कंपनीचे प्रोडक्ट्स -

PhonePe ने दिलेल्या माहितीनुसार, लाइफ इन्शोरन्स आणि जनरल इन्शोरन्स प्रोडक्ट्स विक्रीसाठी IRDAI कडून मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय ते आपल्या 30 कोटीहून अधिक युजर्सला इन्शोरन्ससंबंधी सल्ला देऊ शकतात. IRDAI ने फोनपेला इन्शोरन्स ब्रोकिंग लायसन्स दिलं आहे. त्यामुळे आता फोनपे भारतात सर्व इन्शोरन्स कंपन्यांचे इन्शोरन्स प्रोडक्ट्स विक्री करू शकते.

Instagram अकाऊंट डिलीट करण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी; नाही तर होईल पश्चाताप

स्मार्टफोन हरवला? PhonePay कसं कराल सुरक्षित -

- फोन पे युजर्स 08068727374 किंवा 02268727374 या क्रमांकावर कॉल करू शकतात.

- इथे हवी ती भाषा निवडल्यानंतर, फोन पे अकाउंटमध्ये कोणती समस्या रिपोर्ट करायची आहे ते विचारलं जाईल.

- आता रजिस्टर्ड नंबर टाका, कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जाईल.

- ओटीपी मिळाला नसल्याच्या पर्यायावर क्लिक करा.

- इथे सिम किंवा फोन हरवला असल्याचा पर्याय दिसेल, त्यावर रिपोर्ट करा.

- आता कस्टमर केअरशी जोडलं जाता येईल. फोन नंबर, ईमेल, लास्ट ट्रान्झेक्शन, लास्ट ट्रान्झेक्शन रक्कम असे डिटेल्स विचारले जातील. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत केली जाईल.

First published:

Tags: Online payments