नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : भारतीय ग्राहकांना येणाऱ्या काळात फोनवर बोलणं आणि डेटा महाग पडू शकतो. फोनवर बोलण्यासाठी आणि डेटा वापरासाठी अधिक रक्कम भरावी लागू शकते. टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) लवकरच मोबाईल डेटाचे दर वाढवण्याची घोषणा करू शकतात. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन फर्म (investment information firm) ICRA नुसार, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर्स 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आपली रेवेन्यू ग्रोथ वाढवण्यासाठी कंपन्या हे पाऊल उचलू शकतात. याआधीही गेल्या वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ रेटमध्ये वाढ केली होती.
इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन फर्मच्या रिपोर्टनुसार, टेरिफमध्ये वाढ आणि ग्राहकांना 2G ते 4G मध्ये अपग्रेडेशन केल्यामुळे सरासरी रेवेन्यू सुधारू शकतो. आयसीआरएने आपल्या आउटलुक रिपोर्टमध्ये सांगितलं की, सेक्टर इनफ्लेशन पॉईंटकडे वाढतो आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन वर्षात इंडस्ट्रीचा रेवेन्यू 11 ते 13 टक्के आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास 38 टक्के वाढू शकतो.
महत्त्वाची ठरेल 5G ची सुविधा -
ICRA ने दिलेल्या माहितीनुसार, कॅशफ्लो जेनरेशनमध्ये सुधारणा आणि भांडवली खर्चात कपातीमुळे नियमित ऑपरेशनसाठी बाहेरील कर्जाची आवश्यकता कमी होईल. तसंच एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यूव्यतिरिक्त कर्ज आणि स्पेक्ट्रम लिलावाच्या पुढील फेरीमुळे टेलिकॉम कंपन्यांवर दबाव वाढेल. यात 5G ची मोठी भूमिका असणार आहे.
कोरोना काळात अधिकतर इंडस्ट्रीवर वाईट परिणाम झाला आहे. परंतु टेलिकॉम कंपनीवर याचा अधिक परिणाम झाला नाही. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कूल, कंटेंट वॉचिंग ऍडमुळे डेटा युज वाढला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.