नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनायझेशनने (ISRO) MapmyIndia सह देश मॅपिंग आणि इतर लोकेशन बेस्ट सर्व्हिस डेव्हलप करण्यासाठी एक भागीदारी केली आहे. इस्त्रो आणि मॅपमायइंडियाच्या भागीदारीत देशाला गुगल मॅपचा (Google Map) अल्टरनेटिव्ह मिळू शकतो. सध्या देशात मॅपिंग सर्व्हिसमध्ये गुगल मॅपचा एकाधिकार आहे.
या नव्या भागीदारीअंतर्गत, मॅपमायइंडियाच्या डिजिटल मॅप्स आणि ISRO च्या सॅटेलाईट इमेजरी आणि अर्थ ऑब्जर्वेशनच्या कॅटेलॉग टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. या मॅपमध्ये भारताच्या बॉर्डर्स भारत सरकारनुसार दिसतील असा दावा कंपनीने केला आहे. हे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने पाऊल असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या मॅपमध्ये प्रायव्हसीबाबतही लक्ष दिलं जाणार आहे. ISRO आणि MapmyIndia कडून ही सर्व्हिस लाँच होण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मॅपमायइंडिया मॅप 7.5 लाख भारतीय गावं, रस्ते, बिल्डिंग, 7500 हून अधिक शहरांना कव्हर करेल. जो देशभरातील शहरांमध्ये 63 लाख किलोमीटर रोड नेटवर्कशी कनेक्टेड आहे. हा देशातील सर्वात मोठा डिजिटल मॅप डेटाबेस असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला संपूर्ण स्वदेशी रुपात बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
(वाचा -
ड्रायव्हिंगच्या वेळी Google Map वापरताय? वेळीच सावध व्हा, होईल हजारोंचा दंड)
इस्त्रोकडे संपूर्ण भारतासाठी सॅटेलाईट इमेजरी आणि अर्थ ऑब्जर्वेशनचा एक डिटेल्ड कॅटेलॉग आहे. मॅपमायइंडियाचे मॅप्स, ऍप्स आणि सर्व्हिसेस आता इस्त्रोच्या सॅटेलाईट इमेजरी आणि अर्थ ऑब्जर्वेशन डेटाच्या कॅटेलॉगसह इंटिग्रेट हाईल. त्यामुळे युजर्सला याद्वारे हवामान, प्रदूषण, कृषी आउटपुट, महापूर, भूस्खलन माहितीसह मॅपिंग डेटा पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.