मुंबई, 08 फेब्रुवारी: नामांकित स्मार्टफोन (Smartphone Oppo) ओप्पो कंपनीचा ओप्पो रेनो 7 प्रो 5 जी (Oppo Reno 7 Pro 5G) हा फोन आज (8 फेब्रुवारी 2022) पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि रिटेल स्टोअर्सवर (retail stores) या फोनची विक्री सुरू होईल. हा फोन 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅमसह मिळत असून त्याची किंमत 39,999 रुपये आहे. ग्राहकांना फोन खरेदी करताना अनेक प्रकारच्या ऑफर्सही मिळू शकतात. तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय (ICICI) बँक, कोटक बँक यासारख्या बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 10 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 4000 रुपये कॅशबॅक मिळेल. याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्ही तुमचा जुना फोन बदलून 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकता. इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून ग्राहकांना ओप्पो एम 32 (Oppo M32) नेकबँड फक्त 1399 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय हा स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआय हा ऑप्शन वापरून सुद्धा खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.5 इंचांचा फुल एचडी प्लस एमोलेड (AMOLED Display) डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी (MediaTek Dimensity) 1200 मॅक्स प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स बाबत. हे वाचा- Samsung: समुद्रातील फिशिंग नेट आणि प्लास्टिकपासून होणार स्मार्टफोनची निर्मिती ओप्पो रेनो 7 प्रो 5जी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस (Android 11 OS) बेस्ड आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. याचे स्क्रीन रिझोल्युशन 1080×2400 पिक्सेल आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 1200 मॅक्स प्रोसेसरवर काम करते. 50 मेगापिक्सेल कॅमेरा या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. तर, फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. यामध्ये सोनी आयएमएस 709 (Sony IMX709) सेन्सर वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 65 वॅट फास्ट चार्जिंगसह लाँच करण्यात आला आहे. हे वाचा- तुमचं Driving License Aadhaar कार्डशी लिंक आहे का? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन फोनमध्ये पॉवरसाठी 4500mAh बॅटरी आहे, जी 65 वॅट SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 5 मिनिटं चार्ज केल्यानंतर 4 तास व्हिडिओ पाहता येईल. हा फोन केवळ 31 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. बहुप्रतीक्षित ओप्पो रेनो सीरिजचे फोन विक्रीसाठी उपलब्ध झाल्यामुळे आता त्याला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.