मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /भारीच ना ! आता एका स्मार्टफोनवर वापरात येणार तीन सिम कार्ड्स, Android अपडेट्सच्या फिचरची कमाल

भारीच ना ! आता एका स्मार्टफोनवर वापरात येणार तीन सिम कार्ड्स, Android अपडेट्सच्या फिचरची कमाल

एका फोनमध्ये तीन नंबर्सची सिम कार्ड्स वापरणं आता शक्य होईल आणि ते कोणत्याही थर्ड-पार्टी अ‍ॅपच्या (Third Party App) साह्याने नव्हे, तर हे फीचर अधिकृतरीत्या लॉंच केलं जाऊ शकतं.

एका फोनमध्ये तीन नंबर्सची सिम कार्ड्स वापरणं आता शक्य होईल आणि ते कोणत्याही थर्ड-पार्टी अ‍ॅपच्या (Third Party App) साह्याने नव्हे, तर हे फीचर अधिकृतरीत्या लॉंच केलं जाऊ शकतं.

एका फोनमध्ये तीन नंबर्सची सिम कार्ड्स वापरणं आता शक्य होईल आणि ते कोणत्याही थर्ड-पार्टी अ‍ॅपच्या (Third Party App) साह्याने नव्हे, तर हे फीचर अधिकृतरीत्या लॉंच केलं जाऊ शकतं.

  मुंबई, 8 एप्रिल : हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये दिवसागणिक फीचर्स बदलत असतात. दिवसेंदिवस या स्मार्टफोनमधली फीचर्स अ‍ॅडव्हान्स होत आहेत. सध्या जवळपास प्रत्येकच फोनमध्ये (Smartphone) ड्युएल सिम कार्डची सोय असते. याद्वारे तुम्ही एकाचवेळी तुमच्या फोनमध्ये दोन वेगवेगळी सिम कार्ड्स वापरू शकता. यापुढे तुम्ही तुमच्या फोनमध्ये तीन सिम कार्ड्सचा वापरही करू शकाल. एका फोनमध्ये तीन नंबर्सची सिम कार्ड्स वापरणं आता शक्य होईल आणि ते कोणत्याही थर्ड-पार्टी अ‍ॅपच्या (Third Party App) साह्याने नव्हे, तर हे फीचर अधिकृतरीत्या लॉंच केलं जाऊ शकतं.

  अ‍ॅपल (Apple), सॅमसंग (Samsung) आणि गुगल (Google) यांसारख्या कंपन्या एक नवा प्रयोग करत आहेत. या कंपन्या लवकरच आपल्या स्मार्टफोन्समधून फिजिकल सिम स्लॉट हटवून ई-सिमवर शिफ्ट होण्याच्या प्रयत्नात आहेत. या संदर्भातल्या अनेक बातम्या काही दिवसांपासून येत आहेत; मात्र सध्या या ई-सिम संकल्पनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  वाचा : WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, कायमसाठी बॅन होईल अकाउंट

  दुसरीकडे अँड्रॉइड (Android) एक नवं सॉफ्टवेअर अपडेट घेऊन येत आहे. त्यामध्ये मल्टिपल इनेबल प्रोफाइल (MEP) नावाचं एक फीचर लॉंच केलं जाऊ शकतं. या फीचरच्या साह्याने तुम्ही एकाच स्मार्टफोनमध्ये तीन नंबर्सचा वापर करू शकणार आहात. एका रिपोर्टनुसार, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या अँड्रॉइड 13 या लेटेस्ट अपडेटमध्ये मल्टिपल इनेबल प्रोफाइल (MEP) या फीचरचं टेस्टिंग केलं जात आहे. याबद्दलची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे.

  हे फीचर लॉंच झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एका MEP मध्ये दोन वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांची सिम कार्ड्स वापरू शकणार आहात. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये एक स्लॉट फिजिकल सिम कार्डसाठी असेल आणि दोन स्लॉट ई-सिम कार्डसाठी असतील. एकूणच एका स्मार्टफोनमध्ये तुम्ही तीन नंबरची सिम कार्ड्स वापरू शकणार आहात. हे ई-सिम म्हणजे असं फीचर आहे, जे कोणत्याही स्मार्टफोनमध्ये काम काम करू शकतं.

  वाचा : चुकूनही डायल करू नका हे Haunted Mobile Number; फोन करताच मृत्यू होत असल्याचा दावा

  ई-सिम हे सॉफ्टवेअरवर आधारित एक व्हर्चुअल सिम (Virtual Sim) असेल, जे अप्रत्यक्षरीत्या काम करतं. हे सिम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये फिजिकली बसवावं लागत नाही. अँड्रॉइडच्या या लेटेस्ट अपडेटमध्ये येणाऱ्या या MEP फीचरचा वापर करण्यासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. एका रिपोर्टनुसार, अँड्रॉइड 13 अपडेट या वर्षी जुलैमध्ये लॉंच केलं जाण्याची शक्यता आहे.

  First published:

  Tags: Android, Sim, Smartphone