• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Suzuki ची ही Electric Scooter लवकरच होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Suzuki ची ही Electric Scooter लवकरच होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

आता प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Suzuki लवकरच आपली Electric Two Wheeler लाँच करणार आहे. कंपनी आपल्या Best Selling Model Burgman Street चं इलेक्ट्रिक वर्जन लाँच करणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : भारतीय बाजारात Electric Bike (इलेक्ट्रिक बाईक) ची मागणी वाढती आहे. आता प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Suzuki (सुझुकी) लवकरच आपली Electric Two Wheeler (इलेक्ट्रिक टू-व्हिलर) लाँच करणार आहे. नुकतंच टेस्ट ड्राईव्हवेळी ही टू-व्हिलर स्पॉट करण्यात आली आहे. याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या Best Selling Model Burgman Street (बेस्ट सेलिंग मॉडेल बर्गमॅन स्ट्रिट) चं इलेक्ट्रिक वर्जन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Make in India (मेक इन इंडिया) योजनेनुसार, कंपनी आपल्या या वाहनाची निर्मिती भारतातच करणार आहे. या महिन्याअखेरीस ही इलेक्ट्रिक टू-व्हिलर लाँच केली जाऊ शकते. Suzuki Electric Two Wheeler - एका ऑटो पोर्टलने आपल्या साईटवर Suzuki Electric Burgman Street चे फोटो अपलोड केले आहेत. फोटोमध्ये स्कूटरच्या लाइट आणि ग्राफिक्समध्ये अनेक बदल दिसत आहेत. फोटोनुसार, कंपनी या वाहनाला मोठी हेडलाइट आणि फ्रंट एप्रन देणार आहे. तसंच स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क आणि रियरमध्ये स्प्रिंग लोडेड डुअल सस्पेंशन दिलं जाणार आहे. स्कूटरचा लूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी यात पाच एलॉय व्हिल दिले गेले आहेत. स्कूटरच्या बॅटरी आणि रेंजची कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

  E-Vehicle चालवताना खरंच शॉक बसतो? बॅटरी सेव्हिंगसह जाणून घ्या महत्त्वाच्या Tips

  रिपोर्टनुसार, या स्कूटरला सिंगल चार्जमध्ये 100 ते 120 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि 80 किलोमीटर ताशी टॉप स्पीड मिळू शकतो. यात 7 इंची Touch Screen Full digital instrument console, GPS Navigation, Tracking system, Bluetooth connectivity आणि स्मार्टफोन चार्जिंगसाठी USB दिला जाईल.

  कार क्रॅशमध्ये Tata च्या या गाडीचा झाला चुराडा, पुन्हा खरेदी केली तिच कार

  Suzuki Electric Burgman Street च्या किमतीबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार, 1 लाख ते 1.20 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवाती किमतीसह Electric Burgman लाँच होऊ शकते.
  Published by:Karishma
  First published: