मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Xiaomiचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, रेडमी नोट 11 सीरिजचे तीन स्मार्टफोन होणार लॉन; असे असतील फिचर्स आणि किंमत

Xiaomiचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, रेडमी नोट 11 सीरिजचे तीन स्मार्टफोन होणार लॉन; असे असतील फिचर्स आणि किंमत

शाओमी आता लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबरी घेऊन येत आहे. एकाचवेळी तीन स्मार्टफोन लाँचिंगची तयारी कंपनीनं केली आहे.

शाओमी आता लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबरी घेऊन येत आहे. एकाचवेळी तीन स्मार्टफोन लाँचिंगची तयारी कंपनीनं केली आहे.

शाओमी आता लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबरी घेऊन येत आहे. एकाचवेळी तीन स्मार्टफोन लाँचिंगची तयारी कंपनीनं केली आहे.

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: सध्या स्मार्टफोन्सची (Smartphone) मोठ्या प्रमाणात चलती आहे. आपल्याकडे सर्वात लेटेस्ट टेक्नोलॉजी आणि फीचर्स (features) असलेला फोन असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्मार्टफोन्सची मागणी लक्षात घेता विविध मोबाईल निर्मिती कंपन्या देखील अद्ययावत फीचर्स असलेले फोन बाजारात आणण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. मोबाईल निर्मितीसाठी ओळखली जाणारी चायनीज कंपनी शाओमीसुद्धा (Xiaomi) या स्पर्धेमध्ये आहे. स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रात शाओमीनं आतापर्यंत अनेक चांगल्या फोनची निर्मिती केलेली असून ते ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरलेले आहेत. शाओमी आता लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबरी घेऊन येत आहे. एकाचवेळी तीन स्मार्टफोन लाँचिंगची तयारी कंपनीनं केली आहे. आज (28 ऑक्टोबर 2021) सायंकाळी शाओमी आपली बहुप्रतिक्षित 'रेडमी नोट 11' ही स्मार्टफोन सीरिज लाँच करणार आहे. ही सीरिज सर्वात प्रथम चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. 'रेडमी नोट 11' सीरिजमधील, रेडमी नोट 11 (Redmi Note 11), रेडमी नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro) आणि रेडमी नोट 11 प्रो प्लस (Redmi Note 11 Pro+) हे तीन फोन एका व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान लाँच केले जातील. इंडिया टूडेनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रेडमी नोट 11 सीरिजचं लाँचिंग ऑनलाइन इव्हेंट दरम्यान होणार असल्यानं शाओमीच्या चायना वेबसाइटवर जगभरातील ग्राहकांना ते लाईव्ह पाहणं शक्य होणार आहे. हा इव्हेंट चीनच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल म्हणजेचं भारतामध्ये तुम्ही दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपासून हा इव्हेंट पाहू शकता. रेडमी नोट 11 स्मार्टफोन सीरिजव्यतिरिक्त, शाओमी याच इव्हेंट दरम्यान रेडमी वॉच 2 (Redmi Watch 2) आणि एक नवीन फिटनेस बँड (fitness band) लाँच करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-  WhatsApp Payment service: व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट होणार सुरक्षित, युझर आयडी व्हेरिफिकेशन करावं लागणार

 शाओमीच्या एकाच वेळी लाँच होणाऱ्या तीन नवीन स्मार्टफोन्सबाबत ग्राहकांच्या मनात उत्सुकता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रेडमी नोट 11 सीरिजमध्ये अनेक हाय एन्ड फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. कंपनीनं मागील वर्षी देखील रेडमी नोट 10 प्रो आणि नोट 10 प्रो मॅक्समध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले देऊन ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नोट 10 प्रो मॅक्समध्ये तर 108-मेगापिक्सेलचा कॅमेरा होता. असा कॅमेरा पूर्वी फक्त फ्लॅगशिप डिव्हाईसेसमध्ये दिसत होता. याशिवाय स्वस्तात मिळणाऱ्या नोट 10 मध्ये देखील 60Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह AMOLED डिस्प्ले सुविधा दिली होती.

आता कंपनी पुन्हा एकाच सीरिजमधील तीन स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे. 120 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट हे रेडमी नोट 11 सीरिजमधील तिन्ही फोनचं मुख्य वैशिष्ट्य असू शकतं. नोट 11 प्रो प्लसमध्ये 120 वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असेल, हे शाओमीनं जवळपास नक्की केलेलं आहे. आतापर्यंत कंपनीनं ही सुविधा कुठल्याचं फोनसोबत दिलेली नाही. अगदी फ्लॅगशिप एमआय 11 अल्ट्रासोबत सुद्धा फक्त 67 वॅट चार्जिंगला सपोर्ट आहे. याशिवाय नवीन स्मार्टफोन्सचा परफॉर्मन्स, कॅमेरा क्षमता आणि इतर फीचर्स मध्ये देखील अनेक सुधारणा मिळण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. समोर आलेल्या माहितीनुसार जर शाओमीनं अद्ययावत आणि उच्च दर्जाचे फीचर्स नवीन फोनमध्ये दिले तर या फोनच्या किमती किती असतील हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल. रेडमी नोट 11 सीरिजच्या लाँचपूर्वी फोनच्या संभाव्य किंमती आणि फीचर्स बद्दल समोर आलेली माहिती जाणून घेऊया.

रेडमी नोट 11, रेडमी नोट 11 प्रो आणि रेडमी नोट 11 प्रो प्लसच्या संभाव्य किंमती

आज चीनमध्ये होणाऱ्या लाँच दरम्यान या सर्व स्मार्टफोन्सची अचूक किंमत शाओमी जाहीर करणार आहे. त्यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार या फोनच्या संभाव्य किमती पुढीलप्रमाणे असू शकतात. रेडमी नोट 11 ची किंमत 1 हजार 199 युआन म्हणजेच सुमारे 14 हजार रुपयांपासून, तर नोट 11 प्रो ची किंमत 1 हजार 599 युआन म्हणजेच सुमारे 18 हजार 700 रुपयांपासून सुरू होऊ शकते. नोट 11 प्रो प्लसची किंमत 2 हजार 199 युआन म्हणजे सुमारे 25 हजार 700 रुपयांपासून सुरू होऊ असू शकते.

हेही वाचा-  लहान मुलांना Bike वर बसवण्यासाठीचा नियम बदलणार, सुरक्षेच्यादृष्टीने मोदी सरकारने सांगितले नवे नियम

 रेडमी नोट 11 ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी नोट 11 हा 'नोट 11' या सीरिजमधील पहिला फोन असेल. या फोनमध्ये 6.5 इंचांचा DCI P3 वाइड AMOLED डिस्प्ले असेल. त्याचबरोबर त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि टच सँपलिंग रेट 360 Hz असेल. गेल्या वर्षी आलेल्या रेडमी नोट 10 मध्ये असलेल्या 60Hz डिस्प्लेचं हे अपग्रेड व्हर्जन असेल. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 800 chipset आणि 33 वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5 हजार mAh क्षमतेची बॅटरी असू शकते. हा फोन 6 जीबी किंवा 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेच्या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल.

रेडमी नोट 11 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी नोट 11 प्रो देखील 6.5 इंच 120Hz AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो. मात्र, 8जीबी LPDDR4X RAM आणि 256 जीबी UFS 3.1 अंतर्गत स्टोरेजसह अधिक सक्षम असलेली MediaTek Dimensity 920 चिपसेट यामध्ये असण्याची शक्यता आहे. हा फोन अॅन्ड्रॉईड 11 OS वर चालणार असले आणि त्यामध्ये 67 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5 हजार mAh बॅटरी असू शकते. 11 प्रोमध्ये मागील बाजूस 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी आलेल्या रेडमी नोट 10 मध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा होता, ही बाब याठिकाणी लक्षात घेतली पाहिजे.

हेही वाचा-  Electric car : ताशी 309km वेगाने धावणारी ही आहे भारतातली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार

 रेडमी नोट 11 प्रो प्लसची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नोट 11 प्रो प्लसमध्ये सर्वोत्तम हाय एंड फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टससह 6.67 इंच 120Hz AMOLED डिस्प्ले या फोनसोबत मिळू शकतो. MediaTek Dimensity 1200 AI प्रोसेसरसह 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजनं हा फोन सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. 2021च्या सुरुवातील हाच चिपसेट OnePlus Nord 2 मध्ये व्यारण्यात आला होता. नोट 11 प्रो प्लसमध्ये मागील बाजूस नोट 11 Pro सारखाच कॅमेरा सेटअप असू शकतो याशिवाय 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 120 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh क्षमतेची बॅटरी असू शकते.

चीनमध्ये आज रेडमी नोट 11 सीरिज लाँच केली जात असली तरी अद्याप शाओमीन सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारताबद्दल काहीही निर्णय जाहीर केलेला नाही. भारतामध्ये ही सीरिज कधी लाँच केली जाईल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जर शाओमी वर दिलेल्या सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह तिन्ही स्मार्टफोन्स देणार असेल तर नक्कीच भारतातील ग्राहक ते खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील.

First published:

Tags: Xiaomi, Xiaomi redmi