मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp Payment service: व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट होणार सुरक्षित, युझर आयडी व्हेरिफिकेशन करावं लागणार

WhatsApp Payment service: व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट होणार सुरक्षित, युझर आयडी व्हेरिफिकेशन करावं लागणार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

WhatsApp Payment updates : भारतात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंटची सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) गेल्या वर्षी परवानगी दिली होती.

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) अर्थात यूपीआय (UPI) तंत्रज्ञानाच्या आधारे पैसे हस्तांतरित करण्याची पद्धत भारतात गेल्या काही काळात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. कोरोनाच्या कालावधीत या पद्धतीच्या पेमेंटला अधिक चालना मिळाली. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pe) यांसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट्स केली जातात. पेटीएम, मोबिक्विक यांसारख्या अ‍ॅप्सद्वारेही यूपीआय पेमेंट्स करता येतात. इतकंच नव्हे, तर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp Payments) या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपने थेट चॅटबॉक्समध्ये पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली. तीही यूपीआय तंत्रज्ञानावरच आधारित होती. दरम्यान, आता व्हॉट्सअ‍ॅपच्या या पेमेंट सुविधेत बदल होत असून, ही सुविधा वापरण्यासाठी युझर्सना आयडी प्रूफद्वारे व्हेरिफिकेशन (User ID Verification) करावं लागू शकतं, अशी माहिती पुढे येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप याबद्दल अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही; मात्र अ‍ॅपमधल्या काही बदलांवर तंत्रज्ञानविश्वातल्या सूत्रांनी हा अंदाज बांधला आहे.

वाचा : लहान मुलांना Bike वर बसवण्यासाठीचा नियम बदलणार, सुरक्षेच्यादृष्टीने मोदी सरकारने सांगितले नवे नियम

गुगल पे, फोन पे यांसारख्या यूपीआय तंत्रज्ञानावर चालणाऱ्या अन्य अ‍ॅप्समध्ये युझर आयडी प्रूफ मागितलं जात नाही. मोबिक्विक, पेटीएमसारख्या अ‍ॅप्सवर मात्र युझर्सचं पहिल्यांदा केवायसी केलं जातं. केवायसी व्हेरिफाय झाल्याशिवाय युझर्सना पेमेंटची सुविधा दिली जात नाही. आता व्हॉट्सअ‍ॅपही वॉलेटसारखी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात असावं, असा अंदाज बांधला जात आहे. तशी सुविधा उपलब्ध झाली, तर बिझनेस पेमेंटही तिथेच स्वीकारणं शक्य होऊ शकेल. कंपनीने याबद्दल अधिकृत माहिती अद्याप दिली नसली, तरीही APK Teardown ने या संभाव्य बदलांविषयी अंदाज व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या v2.21.22.6च्या बेटा व्हर्जनमध्ये एक नवी स्ट्रिंग देण्यात आली आहे. ती स्ट्रिंग नव्या व्हेरिफिकेशन सिस्टीमचे संकेत देते, असं त्यात म्हटलं आहे. त्या स्ट्रिंगमध्ये असं लिहिण्यात आलं आहे, की 'तुमची ओळख व्हेरिफाय होऊ शकलेली नाही. डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न करावा. व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट करण्याची सुविधा निरंतर वापरायची असेल, तर तुमची ओळख व्हेरिफाय करा.'

वाचा : गाडी विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सध्या भारत आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. सध्या भारतात पेमेंट करण्यासाठी युझरच्या मोबाइल नंबरचा आधार घेतला जातो. ब्राझीलमध्ये फेसबुक पेचा वापर करताना डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्हेरिफाय करण्याची गरज असते.

भारतात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंटची सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) गेल्या वर्षी परवानगी दिली होती.

First published:

Tags: Money, Whatsapp