Home /News /technology /

सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्ससाठी एकसारखाच चार्जर असावा; युरोपियन युनियनच्या मागणीवर Apple नाराज

सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्ससाठी एकसारखाच चार्जर असावा; युरोपियन युनियनच्या मागणीवर Apple नाराज

सर्व गॅजेट्ससाठी एकाच प्रकारची चार्जिंग केबल (Same charging cable for all) असावी अशी मागणी केली आहे.

    आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या फोनचा चार्जर वेगवेगळा असतो. घरात जुना, बटणांचा फोन असेल, तर त्याचा चार्जर वेगळा; स्मार्टफोन असेल तर त्यातही (Types of Chargers) टाइप-बी आणि टाइप-सी असे दोन वेगवेगळे चार्जर असतात. शिवाय आयफोन असेल तर त्याचा अजूनच वेगळा चार्जर. याव्यतिरिक्त ब्लू-टूथ हेडफोन, पोर्टेबल स्पीकर, कॅमेरा अशा बऱ्याच इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी वेगवेगळ्या चार्जिंग केबल्सची आवश्यकता असते. आता युरोपियन युनियनने (EU Universal charging) अशा प्रकारच्या सर्व गॅजेट्ससाठी एकाच प्रकारची चार्जिंग केबल (Same charging cable for all) असावी अशी मागणी केली आहे. ई-कचरा कमी करण्यासाठी युनिव्हर्सल चार्जिंग बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, युरोपियन युनियनमध्ये असणाऱ्या सर्व देशांमध्ये आता प्रत्येक प्रकारच्या लहान इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सना यूएसबी टाइप-सी (EU plans to bring universal charging system) प्रकारचा चार्जर अनिवार्य करण्यात यावा असा नियम प्रस्तावित करण्यात आला आहे. या चार्जिंग केबल्समुळे होणारा ई-कचरा (Universal charging solution to reduce E-waste) कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्याचा विचार EU करत आहे. हे वाचा - बजेटमध्ये बसणारा Realmeचा नार्झो 50i लॉन्च, जाणून घ्या जबरदस्त फिचर हा नियम स्मार्टफोन, टॅब्लेट, कॅमेरा, हेडफोन्स, पोर्टेबल स्पीकर आणि व्हिडिओ गेम कन्सोलवर लागू करण्यात येईल. यामधून इअर बड आणि स्मार्ट वॉचला लहान आकारामुळे आणि वापर कमी असल्यामुळे सूट देण्यात आली आहे. या नियमामुळे फास्ट चार्जिंग स्पीडही स्टँडर्ड (Standard Fast charging speed) होईल, असं EUचं म्हणणं आहे. युरोपातले कित्येक अधिकारी आणि नेते याबाबत गेल्या दशकभरापासून मागणी करत आहेत. ई-कचरा कमी करण्यासाठी युनिव्हर्सल चार्जिंग सोल्युशन (Universal charging solution) हे एक महत्त्वाचं पाऊल असणार आहे. युरोपियन युनियनने केलेल्या एका संशोधनानुसार, जुन्या, फेकून दिलेल्या चार्जिंग केबल्समुळे दर वर्षी तब्बल 11 हजार टन कचरा तयार होतो. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा - 1 रुपयात घरबसल्या पोर्ट करता येणार Mobile Number, SIM Card बाबत नवा नियम जारी अॅपलने व्यक्त केली नाराजी दरम्यान, अॅपल या जगविख्यात कंपनीने युरोपियन युनियनच्या या प्रस्तावित नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. अॅपलच्या आयफोन्ससोबत युनिक असे लाइटनिंग चार्जर (Apple lightning charger) दिले जातात आणि ते अॅपलनेच तयार केले आहेत. EUने युनिव्हर्सल चार्जिंग सोल्युशन (Apple against Universal charging solution) नियम लागू केला, तर इनोव्हेशनचं नुकसान होईल असं अॅपलचं म्हणणं आहे. तसंच, यामुळे आपल्या उत्पादनांच्या जगभरातल्या युझर्सना अडचण निर्माण होईल, असंही अॅपलकडून बीबीसीला सांगण्यात आलं.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Apple, Technology

    पुढील बातम्या