मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /108 MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Xiaomi चे 2 नवे फोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

108 MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Xiaomi चे 2 नवे फोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

शाओमीचे हे दोन्ही नवे स्मार्टफोन त्यातल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त फीचर्समुळे ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.

शाओमीचे हे दोन्ही नवे स्मार्टफोन त्यातल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त फीचर्समुळे ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.

शाओमीचे हे दोन्ही नवे स्मार्टफोन त्यातल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त फीचर्समुळे ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.

  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : आज बाजारात वैविध्यपूर्ण फीचर्स असलेले स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. अॅपलने नुकतीच आयफोन 13 सीरिज लाँच केली असून, जिओ नेक्स्ट फोन हा रास्त किमतीचा फोनदेखील लवकरच बाजारात दाखल होणार आहे. सध्या अधिक सुस्पष्ट छायाचित्रं टिपणारे, विविध म्युझिक फीचर्स आणि स्टायलिश लूक असणारे स्मार्टफोन ग्राहकांची पसंती मिळवताना दिसत आहेत. त्यामुळे अशी फीचर्स असलेले स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी सर्वच मोबाइल कंपन्यांमध्ये स्पर्धा लागल्याचं दिसून येतं. यात आता शाओमीच्या (Xiaomi) दोन नव्या स्मार्टफोनची भर पडली आहे. अत्यंत लक्षवेधी असलेले हे फोन ग्राहकांची नक्कीच पसंती मिळवतील यात काहीच शंका नाही. या फोनच्या विविध फीचर्सची माहिती `आज तक`ने दिली आहे.

  शाओमी या आघाडीच्या मोबाइल कंपनीने बुधवारी (15 सप्टेंबर) एका ग्लोबल इव्हेंटमध्ये शाओमी 11 टी (Xiaomi 11 T) आणि शाओमी 11 टी प्रो (Xiaomi 11 T Pro) हे दोन नवे स्मार्टफोन लॉंच केले. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये होलपंच डिस्प्ले डिझाइन, 108 MP प्रायमरी कॅमेरा आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. शाओमी 11 टी प्रोमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीनं शाओमी 11 लाइट 5G NE हा स्मार्टफोनही लॉंच केला असून, भारतात या फोनचं लॉंचिंग कधी होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

  शाओमी 11 टीची प्रारंभिक किंमत 499 EUR म्हणजेच सुमारे 43,300 रुपये, तर शाओमी 11 टी प्रोची प्रारंभिक किंमत 649 EUR म्हणजेच सुमारे 56,400 रुपये असेल. हे दोन्ही स्मार्टफोन सेलेस्टियल्स ब्लू, मेटेरॉयट ग्रे आणि मूनलाइट व्हाइट या रंगात उपलब्ध असतील.

  हे ही वाचा-iPhone 13 Mini नव्या सीरिजमधील सर्वात स्वस्त आयफोन, काय आहे किंमत

  शाओमी 11 टी प्रोला ड्युएल सिम सपोर्ट (Dual Sim Support) असेल. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI12.5 वर चालणारा असेल. यात 120 Hz रिफ्रेश रेट असलेला 6.67 इंचाचा फ्लॅट 10 bit AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असेल. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये पाठीमागे 108 MP प्रायमरी कॅमेरा, तर 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि एक टेलिमायक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सेल कॅमेराही यात असेल. या फोनमध्ये ड्युएल स्टिरिओ स्पिकर्स आहेत. तसंच 120 W फास्ट चार्जिंग सपोर्टसाठी 5000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

  शाओमी 11 टी या स्मार्टफोनलाही ड्युएल सिम सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 (Android 11) बेस्ड MIUI 12.5 वर चालेल. 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचांचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले यात देण्यात आला आहे. याची रॅम (RAM) 8 GB असून, ऑक्टाकोअर Media Tek Dimensity 1200- Ultra प्रोसेसर आहे.

  शाओमी 11 टी स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 108MP प्रायमरी कॅमेरासह 8MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि एक टेलिमायक्रो शूटर देण्यात आलेला आहे. सेल्फीसाठी 16 MP कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यातला फिंगर सेन्सर हा साउंड माउंटेड आहे.

  शाओमीचे हे दोन्ही नवे स्मार्टफोन त्यातल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त फीचर्समुळे ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.

  First published:

  Tags: Smart phone, Xiaomi