नवी दिल्ली, 16 मे : टेक कंपनी शाओमीने (Xiaomi) इंडियन युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. ऑफरअंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर 50 मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असणारा Xiaomi 12 Pro 5G फोन 6000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह खरेदी करता येईल. हा कॅशबॅक ICICI बँकेच्या कार्डवर दिला जात आहे. त्याशिवाय कंपनी युजर्सला चेकआउटवेळी 4000 रुपयांचा अॅडिशनल डिस्काउंटही देत आहे. या दोन्ही ऑफर मिळून 10 हजार रुपयांचा डिस्काउंट होतो.
खास ऑफर म्हणजे हा फोन खरेदी करणाऱ्या युजरला मेक माय ट्रिपकडून 1 लाख रुपयांचं ट्रॅव्हल व्हाउचर जिंकण्याची संधी मिळेल. हे व्हाउचर युजर देशात किंवा विदेशात फिरण्यासाठी हॉलिडे पॅकेज म्हणून वापरु शकतात. या स्किमचे डिटेल्स तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर घेऊ शकता.
काय आहेत फीचर्स -
- 3200x1440 पिक्सल रेजॉलूशन
- 6.73 इंची 2K+ LTPO AMOLED डिस्प्ले
- 1500 निट्स पीक ब्राइटनेससह डिस्प्लेमध्ये HDR10+ आणि डॉल्बी विजन सपोर्ट
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
- स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट
- 12 जीबीपर्यंतचा LPDDR5 रॅम आणि 256 जीबीपर्यंतचं UFS 3.1 स्टोरेज
- 4600mAh बॅटरीसह 120W हाइपर चार्जिंग
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
- हार्मन कार्डन साउंडसह क्वॉड स्पीकर आणि डॉल्बी ऐटमॉस
- लिक्विड कूलिंग फीचर
कॅमेरा -
फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरला एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाओमी ग्रुपविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाने अनेक वरिष्ठ अधिकारी, संचालक, CFO सह इतर अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली-एनसीआर, गुडगावमध्ये छापेमारी करण्यात आली होती. एका रिपोर्टनुसार, भारतात स्मार्टफोन मार्केट जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचं आहे. यात 70 टक्के भागीदारी चिनी कंपन्यांच्या प्रोडक्टची आहे. त्याशिवाय भारतात टेलिव्हीजन मार्केटही जवळपास 30000 कोटी रुपयांचं आहे. यात चिनी कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीची भागीदारी जवळपास 45 टक्के आहे. नॉन स्मार्ट टीव्हीची भागीदारी जवळपास 10 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Xiaomi, Xiaomi redmi