नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : JioPhone Next या वर्षाच्या सुरुवातीला Reliance च्या वार्षिक सर्वसाधारण सभा 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. Jio स्मार्टफोन Google च्या सहयोगातून विकसित करण्यात आला आहे. जिओने आधी भारतीय युजर्सला दोन फीचर फोन दिले आहेत. आता JioPhone Next लाँचसह कंपनी आपला पहिला स्मार्टफोन बाजारात आणत आहे. JioPhone Next गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात 10 सप्टेंबर रोजी बाजारात लाँच होणार आहे.
जिओने या फोनच्या रिलीज डेटची घोषणा केली, परंतु किंमत, स्पेसिफिकेशनस् आणि इतर फीचर्सची अद्याप माहिती दिलेली नाही. तसंच हा स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ऑफिशिअल वेबसाईट, रिलायन्स स्टोर्स आणि रिटेल शॉप्सवर फोन उपलब्ध असेल असा अंदाज आहे.
भारतात JioPhone Next च्या किमतीचा तसंच फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु मिळालेल्या लीकनुसार, Jio स्मार्टफोन 3499 रुपयांपर्यंत असू शकतो. तसंच JioPhone नेक्स्टमध्ये 5.5-इंची HD डिस्प्ले, क्वालकॉम QM215 SoC असण्याची शक्यता आहे.
हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यात 2GB RAM + 16GB स्टोरेज आणि 3GB RAM + 32GB स्टोरेज सामिल असेल. 2GB RAM ची किंमत जवळपास 3499 असू शकते. तर टॉप एंड मॉडेलची किंमत जवळपास 5,000 रुपयांपर्यंत असू शकते.
फोनच्या रियर पॅनलवर 13 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनला फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल सेंसर असेल. तसंच 2,500mAh बॅटरी, डुअल सिम, ब्लूटूथ v4.2, GPS कनेक्टिव्हिटी आणि 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट सामिल असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Industries, Reliance Jio, Tech news