• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Ola Scooter खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू, अशी मिळेल होम डिलिव्हरी!

Ola Scooter खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू, अशी मिळेल होम डिलिव्हरी!

कॅब सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ओला कंपनीने (Ola Company) काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) बाजारात आणणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आजपासून ओला कंपनीने या स्कूटरची ऑनलाइन शॉपिंग विंडो सुरू केली आहे

  • Share this:
नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: कॅब सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ओला कंपनीने (Ola Company) काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) बाजारात आणणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी तमिळनाडूत जगातली सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी (Scooter Factory) उभारण्यात आल्याचंही कंपनीने म्हटलं होतं. त्यानंतर कंपनीने जुलै महिन्यात प्री-लाँच बुकिंग (Pre-Launch Booking) सुरू करून 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. आता आजपासून, म्हणजेच 8 सप्टेंबरपासून ओला कंपनीने या स्कूटरची ऑनलाइन शॉपिंग विंडो सुरू केली आहे. ही स्कूटर खरेदीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. ओलाने एस 1 (S1) आणि एस 1 प्रो (S1Pro) अशा दोन स्कूटर्स आणल्या असून त्यांची किंमत अनुक्रमे 99 हजार 999 आणि 1 लाख 29 हजार 999 रुपये आहे. प्री-लाँच बुकिंग सुरू केल्यानंतर 24 तासांच्या आत देशातल्या एक हजारांहून अधिक शहरांतून मिळून एक लाखांहून अधिक स्कूटर्सचं बुकिंग केलं गेलं. एवढ्या दमदार प्रतिसादानंतर आता ही स्कूटर प्रत्यक्ष घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुढील ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्कूटर कंपनीतून थेट ग्राहकाच्या घरी किंवा त्याने निवडलेल्या ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी (Electric Scooter) ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, पुढच्या महिन्यापासून टेस्ट राइडही सुरू होण्याची शक्यता आहे. हे वाचा-आता Ola, Zomato थर्ड पार्टी Apps साठी द्यावे लागणार नाहीत क्रेडिट कार्ड डिटेल्स खरेदीच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण इन्शुरन्सबद्दल जाणून घेऊ. ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅपचा वापर करून ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा इन्शुरन्स उतरवण्याचा पर्याय निवडू शकता. या रजिस्ट्रेशनसाठी एक वर्षाची ऑन डॅमेज आणि पाच वर्षांची थर्ड पार्टी बेस पॉलिसी घेणं अनिवार्य आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची प्रक्रिया - ओलाने सादर केलेल्या दोन मॉडेल्सपैकी कोणत्याही एका मॉडेलसाठी ज्यांनी बुकिंग केलं आहे, त्यांनी पेमेंट प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ओला इलेक्ट्रिक वेबसाइटवर लॉग इन करावं. ही प्रक्रिया केवळ स्टॉक संपेपर्यंतच सुरू राहणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. - एक मॉडेल निवडल्यानंतर उपलब्ध असलेल्या 10 रंगांमधून आपल्या आवडीचा रंग निवडावा. तसंच, मॅट किंवा ग्लॉस यांपैकी एका फिनिशची निवड करावी. बुकिंगच्या वेळी निवडलेले पर्याय या टप्प्यात बदलता येऊ शकतात. हे वाचा-Gmail ची ही खास ट्रिक माहितेय का? डिलीट करू शकता पाठवलेला Email -आपल्या वेबसाइटवरचं ऑनलाइन पेमेंट पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा ओला कंपनीने केला आहे. कर्ज आणि ईएमआयसाठी कंपनीने अनेक आर्थिक संस्थांशी करारही केला आहे. ओला फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ओला एस वन मॉडेलसाठी 2999 रुपये आणि एस वन प्रो मॉडेलसाठी 3199 रुपयांपासून सुरू होणाऱ्या ईएमआयसह फायनान्सिंग (Finance) उपलब्ध आहे. - फायनान्सची गरज नसेल, त्यांनी आपल्या सिलेक्शननुसार 20 हजार किंवा 25 हजार रुपये अॅडव्हान्स पेमेंट करता येतं. उर्वरित रक्कम चलन मिळाल्यानंतर भरावी लागते. - या फॉरमॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना डिलिव्हरी डेट दिली जाणार आहे. - डाउन पेमेंट आणि अॅडव्हान्स रक्कम रिफंडेबल (Refundable) आहे. म्हणजे मध्येच विचार बदलला, तर ही रक्कम परत मिळू शकते.
First published: