मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple Watch ने महिलेला बसला मोठा फटका, सेकंदात गायब झाले 30 लाख

Apple Watch ने महिलेला बसला मोठा फटका, सेकंदात गायब झाले 30 लाख

एका Apple Watch द्वारे महिलेला मोठा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका Apple Watch द्वारे महिलेला मोठा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका Apple Watch द्वारे महिलेला मोठा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 27 मे : Smartwatch मध्ये Apple Watch चं नाव सर्वात पहिलं येतं. Apple Watch स्टायलिश डिजाइन आणि जबरदस्त फीचर्ससाठी ओळखलं जातं. परंतु एका Apple Watch द्वारे महिलेला मोठा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फिरायला गेलेल्या महिलेचं Apple Watch हरवलं आणि काही तासांत तिच्या अकाउंटमधून 40 हजार डॉलर गायब झाले.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील एका महिलेने दावा केला आहे, की फ्लोरिडामध्ये डिज्नी वर्ल्डमध्ये एका राइडदरम्यान तिचं Apple Watch हरवलं. त्यानंतरच तिच्या अकाउंटमधून मोठी रक्कम गायब झाली. डब्ल्यूडीडब्ल्यू्च्या रिपोर्टनुसार, पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत सांगितलं, की तिचं हर्मस एडिशनचं Apple Watch हरवलं. हे वॉच 1300 डॉलरचं होतं.

Apple Watch शी लिंक होतं क्रेडिट कार्ड -

या वॉचसह महिलेचं क्रेडिट कार्ड लिंक होतं. त्या क्रेडिट कार्डची क्रेडिट लाइन अनलिमिटेड होती. क्रेडिट कार्ड फ्रॉडची बाब लक्षात येताच महिलेने तिचे सर्व कार्ड्स डिअॅक्टिव्हेट केले.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Apple Watch मनगटावरुन हटवल्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉक होतं. लॉक हटवण्यासाठी त्यात पीन टाकावा लागतो. त्यानंतर पेमेंट करता येतं. अशात Apple Watch मुळे क्रेडिट कार्डमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता कमी होते.

हे वाचा - iPhone मुळे वाचला महिलेचा जीव, जाणून घ्या या जबरदस्त सेफ्टी फीचरबाबत

दरम्यान, आयफोनमुळे एका तरुणीचा जीव वाचल्याची घटना नुकतीच समोर आली होती. अमेरिकेतील व्हर्जिनियामधील (Verginia in US) केली वर्स्ट (Kelli Worst) हिला याचा नुकताच अनुभव आला आहे. तिनं नुकताच तिला आलेला एक भयंकर अनुभव आणि त्यातून ती कशी वाचली हे शेअर केलं आहे. एका हल्लेखोरानं तिच्यावर हल्ला केला होता; पण तिनं वेळीच प्रसंगावधान राखून घेतलेला निर्णय आणि तिच्या iPhone ने दिलेली साथ यामुळे तिला इजा झाली नाही. iPhone मधील SOS फीचरमुळे तिची मोठी मदत झाली. SOS ॲक्टिव्हेट केल्यानंतर 911 या नंबरवर सर्वकाही ऐकू जाऊ लागलं आणि त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब पोहोचले आणि तिची सुटका केली.

First published:

Tags: Apple, Iphone, Tech news