मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /iPhone मुळे वाचला महिलेचा जीव, जाणून घ्या या जबरदस्त सेफ्टी फीचरबाबत

iPhone मुळे वाचला महिलेचा जीव, जाणून घ्या या जबरदस्त सेफ्टी फीचरबाबत

संकटाची चाहूल लागल्यामुळे वर्स्ट तिथून वळली आणि दूर जाऊ लागली. पण त्या माणसाने तिचा पाठलाग केला आणि तिचं तोंड दाबलं. तिचा चेहरा त्यानं खाली दाबला. सुटकेसाठी धडपड करताना वर्स्टच्या हाती तिचा iPhone लागला आणि...

संकटाची चाहूल लागल्यामुळे वर्स्ट तिथून वळली आणि दूर जाऊ लागली. पण त्या माणसाने तिचा पाठलाग केला आणि तिचं तोंड दाबलं. तिचा चेहरा त्यानं खाली दाबला. सुटकेसाठी धडपड करताना वर्स्टच्या हाती तिचा iPhone लागला आणि...

संकटाची चाहूल लागल्यामुळे वर्स्ट तिथून वळली आणि दूर जाऊ लागली. पण त्या माणसाने तिचा पाठलाग केला आणि तिचं तोंड दाबलं. तिचा चेहरा त्यानं खाली दाबला. सुटकेसाठी धडपड करताना वर्स्टच्या हाती तिचा iPhone लागला आणि...

  नवी दिल्ली, 25 मे : तंत्रज्ञान आता अतिप्रगत (Advanced Technology) झालं आहे. तंत्रज्ञानाचा वापर आता फक्त मनोरंजनाच्या साधनांपुरताच होत नाही. तर त्या पलीकडे आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा सर्रास वापर होत आहे. काही वेळेस तर यामुळे अनेक जीवावरचे धोके टळतात, याबद्दल इकॉनॉमिक टाइम्सच्या वेबसाइटवर एक वृत्त देण्यात आलं आहे.

  जगभरातल्या महिलांसाठी रात्री अंधार पडल्यानंतर प्रवास करणं हे एक मोठं आव्हान असतं. अनेक देशांच्या सरकारांनी किंवा त्या-त्या शहरांतील नेते, प्रशासनानंही महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. आता यात तंत्रज्ञानाचाही हातभार लागत आहे. म्हणजेच तंत्रज्ञान महिलांच्या सक्षमीकरणात (Technology In Women Empowerment) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता स्मार्टफोन संकट काळात महिलेसाठी एक वरदान ठरलं आहे.

  अमेरिकेतील व्हर्जिनियामधील (Verginia in US) केली वर्स्ट (Kelli Worst) हिला याचा नुकताच अनुभव आला आहे. तिनं नुकताच तिला आलेला एक भयंकर अनुभव आणि त्यातून ती कशी वाचली हे शेअर केलं आहे. एका हल्लेखोरानं तिच्यावर हल्ला केला होता; पण तिनं वेळीच प्रसंगावधान राखून घेतलेला निर्णय आणि तिच्या iPhone ने दिलेली साथ यामुळे तिला इजा झाली नाही.

  केली तिच्या हायस्कूलच्या मैत्रीणींबरोबर शनिवारी रात्री पार्टी एंजॉय करत होती. त्यावेळेस ही घटना घडली. “आम्ही खरोखरंच धम्माल करत होतो. आमच्यासाठी ती एक खूपच छान गर्ल्स नाईट आउट होती,” तिनं Wavy.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

  साधारणपणे पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास वर्स्ट आणि तिच्या मैत्रीणींनी तिथून निघायचं ठरवलं आणि त्यांनी कॅब (Lyfts) बुक केली. त्यांच्या कार आल्यावर प्रत्येकजण आपापल्या कारमध्ये बसून निघून गेल्या. मात्र वर्स्ट जेव्हा तिच्या कारचा दरवाजा उघडत होती तेव्हा तिथे एक माणूस आला. तो माणूस दिसायला अगदी चांगला आणि सर्वसाधारण होता. त्यानं तिला त्याचा फोन शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. आपण लष्करात असल्याचं त्यानं सांगितलं आणि तिचा विश्वास संपादन केला.

  वर्स्ट सातत्यानं त्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर फोन करत होती. पण तो फोन उचलला जात नव्हता. अखेर वर्स्टनं ‘FindMy’ हे फीचर वापरून त्या व्यक्तीचा फोन शोधायचं ठरवलं. पण तो फोन नंबर अचानक अवैध (Invalid) झाल्यावर वर्स्टला संशय आला. आपण कदाचित चुकीचा नंबर डायल केला असेल असं समजून तिनं तिचा iPhone त्या व्यक्तीच्या हातात दिला. तेवढ्यात ती व्यक्ती वर्स्टकडे बघून अश्लील हावभाव करू लागली.

  संकटाची चाहूल लागल्यामुळे वर्स्ट तिथून वळली आणि दूर जाऊ लागली. पण त्या माणसाने तिचा पाठलाग केला आणि तिचं तोंड दाबलं. तिचा चेहरा त्यानं खाली दाबला. सुटकेसाठी धडपड करताना वर्स्टच्या हाती तिचा iPhone लागला आणि तिनं त्यावरील बाजूचे बटण, आवाजाचे बटण दाबून आणि स्वाईप करून त्यातील SOS फीचर सुरू केलं. SOS ॲक्टिव्हेट केल्यानंतर 911 या नंबरवर सर्वकाही ऐकू जाऊ लागलं आणि त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब पोहोचले आणि तिची सुटका केली. ‘माझा फोन माझ्या हातात होता आणि SOS कसं ॲक्टिव्हेट करायचं हे माहिती असल्यामुळे माझा जीव वाचला,’ असा अनुभव वर्स्टनं सांगितला.

  हे वाचा - कुठे जातो? काय करतो? बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी तरुणीने लढवली भलतीच शक्कल

  iPhone मध्ये इमर्जन्सी SOS कसं ॲक्टिव्हेट करायचं?

  काही संकट आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी SOS हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. FaceID सह iPhone SE (2 जनरेशन किंवा त्यानंतरचं मॉडेल), iPhone 8 आणि iPhone 8 Plus या फोन्सचे वापरकर्ते Emergency SOS ॲक्टिव्हेट करू शकतात. त्यासाठी फोनचे साईड बटण किंवा आवाजाचे बटण दाबून ठेवा. जोपर्यंत Emergency SOS स्लाईडर स्क्रीनवर दिसत नाही आणि iPhone मधून इशारा देणारा आवाज येत नाही आणि काउंटडाउन सुरु होत नाही तोपर्यंत हे बटण दाबून ठेवा. काउंटडाउन बंद झाल्यावर तुमच्या iPhone मधून कॉल केला जाईल.

  iPhone मधील साईड बटण पाच वेळा दाबल्यानंतरही SOS सुरु होऊ शकेल. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जा; Emergency SOS सिलेक्ट करा, त्यानंतर Call With 5 Presses वर स्विच व्हा. Home Button असलेल्या iPhone च्या साईड बटण किंवा Sleep/Wake या बटणांवर क्लिक करा. ही बटणं कोणती आहेत ते फोनच्या मॉडेलवर अवलंबून आहे. एकदा का इमर्जन्सी कॉल संपला की युजर कोणाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल iPhone अलर्ट होतो आणि त्यांना युजरचे त्यावेळचे लोकेशन उपलब्ध असेल तर ते पाठवतो. त्यामुळे लगेचच आपत्कालीन परिस्थितीची कल्पना येऊन तुमच्यापर्यंत शक्य तितक्या लवकर मदत पोहोचते.

  एकूणच, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीव वाचू शकतो. फक्त आपण आपला स्मार्टफोन मनोरंजनाकरता न वापरता त्यामध्ये जीव वाचवणारी, सुरक्षेसाठीची कोणती महत्त्वाची Apps आहेत याबद्दलची माहिती करून घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या फोनमधील सर्व बारकावेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. संकट आल्यास कोणतं बटण दाबून इमर्जन्सी कॉल करता येतो किंवा मदत मागता येते हे नक्की बघून ठेवा.

  First published:
  top videos

   Tags: Apple, Iphone, Tech news