मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp वर नाहीत त्या सुविधा मिळतील Telegram वर! सिक्रेट चॅटसह 5 कमाल फीचर्स

WhatsApp वर नाहीत त्या सुविधा मिळतील Telegram वर! सिक्रेट चॅटसह 5 कमाल फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) आल्यानंतर लोकांनी अन्य मेसेजिंग अ‍ॅप्स वापरायला सुरुवात केली. त्यामुळे नंतरच्या काळात टेलिग्राम (Telegram), सिग्नल (Signal) अशा अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर वाढला. टेलिग्राममध्ये अशी काही फीचर्स आहेत, की जी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 29 एप्रिल: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगातलं सर्वांत जास्त वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप (Instant Messaging App) आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) आल्यानंतर लोकांनी अन्य मेसेजिंग अ‍ॅप्स वापरायला सुरुवात केली. त्यामुळे नंतरच्या काळात टेलिग्राम (Telegram), सिग्नल (Signal) अशा अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर वाढला. त्या अ‍ॅप्सच्या युजर्सची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. टेलिग्राममध्ये अशी काही फीचर्स आहेत, की जी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत.

  क्लाउड स्टोरेज (Cloud Storage) -

  टेलिग्राममध्ये हे एक विशेष फीचर देण्यात आलं आहे. त्याद्वारे युजर्स आपल्या फाइल्स, फोटोज, डॉक्युमेंट्स आणि मेसेजेस क्लाउड स्टोरेजमध्ये ठेवू शकतात. या क्लाउड स्टोरेजचा उपयोग युजर्स कुठूनही लॉगिन करून करू शकतात. या क्लाउड स्टोरेजमध्ये अनलिमिटेड डेटा स्टोरेजची सुविधा उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अजून तरी असं कोणतंही फीचर उपलब्ध नाही.

  ग्रुप सदस्यांची संख्या (Group Members) -

  टेलिग्राम युजर्सना ग्रुप चॅटिंगसाठी (Group Chatting) ग्रुप, सुपरग्रुप, चॅनेल अशी फीचर्स मिळतात. टेलिग्राम ग्रुपमध्ये युजरला दोन लाख सदस्यांना समाविष्ट करता येतं. सुपरग्रुपमध्ये 200 सदस्यांना समाविष्ट करता येतं. तसंच चॅनेल या फीचरचा वापर करून युजरला ब्रॉडकास्टिंगही करता येतं. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजरला केवळ 256 जणांनाच एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेता येतं.

  (वाचा - ATM मधून पैसे काढण्यासाठी असा केला जातोय फ्रॉड,बँकांकडून सुरक्षा वाढवण्याचा आदेश)

  चॅट सिक्युरिटी (Chat Security) -

  टेलिग्राममध्ये सिक्रेट चॅट (Secret Chat) फीचर उपलब्ध आहे. त्यासाठी युजरला एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड पर्याय सुरू करावा लागतो. त्यात युजरद्वारे पाठवलेल्या मेसेजमध्ये सेल्फ डिस्ट्रक्ट टायमरही लावता येतो. त्यामुळे मेसेज वाचल्यानंतर आपोआप डिलीट होऊ शकतो. टेलिग्राममध्ये सिक्रेट चॅट कोणालाही फॉरवर्ड करता येत नाही. तसंच, कोणी या चॅटचा स्क्रीनशॉट घेतला, तर युजरलाही त्याचं नोटिफिकेशन जातं. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या तरी असं फीचर उपलब्ध नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरचं चॅटिंग एंडटू एंड एन्क्रिप्टेड (End to End Encrypted) असतं.

  फाइल शेअरिंग (File Sharing) -

  व्हॉट्सअ‍ॅपद्वारे युजरला केवळ 60 एमबी पर्यंतचीच फाईल पाठवता येते. टेलिग्राममध्ये मात्र दीड जीबी पर्यंतची फाईल शेअर करता येते. हे टेलिग्रामचं खास फीचर आहे.

  (वाचा - Truecaller ने लाँच केली कोविड रुग्णालयांची फोन डायरेक्टरी; कठीण काळात होईल मदत)

  मल्टि-प्लॅटफॉर्म सपोर्ट (Multi-Platform Support) -

  टेलिग्राममध्ये युजर अनेक डिव्हाईसवर आपलं नाव आणि पासवर्ड वापरून लॉगिन करू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मात्र युजर एका वेळी फक्त दोनच डिव्हाईसवर (म्हणजे फोन आणि वेब) लॉगिन करू शकतो.

  First published:

  Tags: Tech news, Technology, Whatsapp, WhatsApp features