नवी दिल्ली, 29 एप्रिल: कोरोना काळात एकीकडे ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली असताना दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉडमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही काळात ATM फ्रॉडमध्येही वाढ झाली आहे. वाढत्या फसवणुकीचे प्रकार पाहता बँकांनी आपल्या ATMs च्या नेटवर्कमध्ये end-to-end encryption द्वारे सुरक्षा नियम अधिक मजबूत करण्यास सांगितलं आहे. बँकांशी झालेल्या चर्चेत सरकारने बँकांना सूचित केलं, की Man in the Middle (MiTM) फ्रॉड वाढले आहेत. यात 'ATM Switch' कडून 'ATM Host' ला पाठवण्यात आलेले मेसेज फ्रॉड करणारे पकडतात आणि त्यात फेरबदल करुन कॅश काढतात.
ATM फ्रॉड -
याप्रकरणी संबंधी एका सिक्योरिटी अधिकाऱ्यांने सांगितलं, की सिक्योरिटी एजेंसीजला तपासादरम्यान असं आढळून आलं, की सायबर फ्रॉड गँगने ATMs मधून पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फ्रॉड करणारे सर्वात आधी ATM च्या नेटवर्क केबल LAN सह छेडछाड करतात. 'ATM Switch' कडून पाठवण्यात आलेल्या Declined मेसेजमध्ये फेरबदल करुन त्याला 'successful cash withdrawal transaction' मध्ये बदलतात आणि ATM मधून कॅश काढतात.
फ्रॉड करणारे सर्वात आधी ATM मशीन आणि ATM भागात लावलेले राउटर किंवा स्विचमध्ये एक डिव्हाईस जोडतात. या डिव्हाईसच्या मदतीने ATM Switch कडून येणाऱ्या रिस्पॉन्समध्ये बदल करतात, जे ATM द्वारे नेटवर्कशी जोडले जातात. त्यानंतर ब्लॉक कार्ड्सचा वापर पैसे काढण्यासाठी करतात. त्यानंतर 'ATM Switch' declined चा मेसेज पाठवतो त्यावेळी, मध्येच बसलेला फ्रॉड करणारा (Man in the Middle (MiTM) या मेसेजमध्ये फेरबदल करतो आणि ट्रान्झेक्शन declined मधून Approved मध्ये बदलतो आणि कॅश काढली जाते. त्यामुळेच बँकांना 'ATM Terminal' किंवा PC आणि 'ATM Switch' मध्ये end-to-end encryption देण्याचं सांगण्यात आलं आहे.
Indian Computer Emergency Response Team (CERT-In) कडून दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये डिजीटल बँकिंगमध्ये सायबर सिक्योरिटीची 1,59,761 प्रकरणं रिपोर्ट करण्यात आली.
2019 मध्ये ही संख्या वाढून 2,46,514 वर गेली असून, 2020 मध्ये 2,90,445 घटना रिपोर्ट करण्यात आल्या. या घटनांमध्ये वेबसाईट हॅकिंग, व्हायरस नेटवर्क स्कॅनिंग सामिल आहे. CERT-In राष्ट्रीय टेक्नोलॉजी कंपनी असून याचं काम भारतीय सायबर क्षेत्राला सायबर अटॅकपासून सुरक्षा देणं हे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Money fraud, Online fraud, Tech news, Technology