Home /News /technology /

64MP कॅमेरासह Oppo चे Reno 6 Pro 5G आणि Reno 6 आज होणार लाँच, पाहा काय असेल किंमत

64MP कॅमेरासह Oppo चे Reno 6 Pro 5G आणि Reno 6 आज होणार लाँच, पाहा काय असेल किंमत

Oppo Reno 6 Pro 5G आणि Oppo Reno 6 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे.

    नवी दिल्ली, 14 जुलै : Oppo Reno 6 Pro 5G आणि Oppo Reno 6 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. ओप्पोचा व्हर्चुअल इव्हेंट दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये Oppo Enco X ईयरबड्सदेखील लाँच करण्यात येणार आहेत. या इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रिमिंग यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर पाहता येणार आहे. हे दोन फोन एक्सक्लूसिव्ह फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहेत. Oppo Reno 6 Pro 5G ची किंमत या आठवड्याच्या सुरुवातीला एक अनबॉक्सिंग व्हिडीओद्वारा लीक झाली आहे. व्हिडीओमध्ये 46,990 रुपये किंमत असल्याचं पाहण्यात आलं. तर Oppo Reno 6 ची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये Oppo Reno 6 ची सुरुवातीची किंमत CNY 2,799 जवळपास 31,800 रुपये आहे. तर Oppo Reno 6 Pro 5G ची किंमत CNY 3,499 जवळपास 39,800 रुपये आहे. 9 धोकादायक Apps कडून Facebook पासवर्ड्सची चोरी; पाहा कसं सुरक्षित ठेवाल तुमचं FB Oppo Reno 6 स्पेसिफिकेशन्स - - 6.43 इंची FHD+ डिस्प्ले - ऑक्टा-कोर मीडियाटेक 600 प्रोसेसर - अँड्रॉईड 11 - 4300mAh बॅटरी - 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट कॅमेरा - या फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सल आहे. दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी शूटर कॅमेरा आहे. Mi Anniversary Sale: स्वस्त स्मार्टफोनसह फ्रीमध्ये मिळतोय Wifi Smart Speaker Oppo Reno 6 स्पेसिफिकेशन्स - - 6.55 इंची FHD+ डिस्प्ले - ऑक्टा-कोर मीडियाटेक 1200 प्रोसेसर - अँड्रॉईड 11 - 4500mAh बॅटरी - 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट कॅमेरा - फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी सेंसर 64 MP + 8MP अल्ट्रा-वाईड अँगल + 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Oppo, Oppo smartphone, Smartphone

    पुढील बातम्या