• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Alert! Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका

Alert! Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका

Windows 11 इन्स्टॉल करण्याच्या उत्साहात केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडेल.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 जुलै: मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) विंडोज 11 (Windows 11) बद्दल लोक खूप उत्सुक आहेत. लोकांना आपल्या कॉम्प्युटर/लॅपटॉपमध्ये OS चे नवीन व्हर्जन इन्स्टॉल (New Version Install) करण्याची उत्सुकता लागली आहे. युझरच्या (User) या उत्सुकतेचा फायदा सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) घेत आहेत. लोकांना मालवेअर (Malware) असलेले फेक विंडोज 11 इन्स्टॉलर (Fake Installers) पाठवत आहेत. अशा परिस्थितीत अतिउत्साह दाखवला आणि गाफिल राहिल्यास आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे युजर्सनी अशा इन्स्टॉलरद्वारे विंडोज 11 इन्स्टॉल करणं टाळायला हवं. सायबर सिक्युरिटी (Syber security) कंपनी कॅस्परस्कच्या (Kaspersk) म्हणण्यानुसार विंडोज 11 अपडेट्स इन्स्टॉल करून युझर फेक इन्स्टॉलर्सला बळी पडू शकतात. यामुळे आपल्या कॉम्प्युटरमध्ये घातक मालवेअर प्रवेश करू शकतो. सायबर सिक्युरिटी कंपनीने असंही सांगितलं आहे की सायबर गुन्हेगार विंडोज 11 अपडेटसोबत एक्‍स्‍ट्रा प्रोग्रॅम टाकत आहेत किंवा मालवेअर पोस्ट करीत आहेत. हे वाचा - सुरक्षित आणि Strong Password साठी या गोष्टी लक्षात ठेवाच, हॅकिंगपासून होईल बचाव यामधील फाइल्सची नावे नवीन अपडेट सारखीच दिसतात. 86307_windows 11 build 21996.1 x64 + activator.exe हे अशाच एका फाईलचे नाव आहे. अशा नावामुळे 1.75 जीबीची (GB) ही फाईल आपल्याला एकदम नवीन अपडेट सारखी दिसते. मात्र जास्त करून या फाईलमधील जास्त स्पेस डीएलएलने (DLL) व्यापलेली असते. ज्यामध्ये निरुपयोगी माहिती असते. युझर्सनी अशा फाईल्सपासून दूर राहावे. Kaspersk च्या मते, ही फाईल रन केल्यामुळे इन्स्टॉलर त्याचे कार्य सुरू करतो. हा इन्स्टॉलर विंडोजवर फक्त एका सामान्य इंस्टॉलेशन विझार्डसारखा (Installation Wizard) दिसतो. हे वाचा - Android, iPhone users, सोप्या पद्धतीने बनवू शकतात WhatsApp Stickers तसंच एक दुसरा इन्स्टॉलरदेखील आहे, ज्यामध्ये लायसन्स ॲग्रीमेंट (Licence Gareem8) सुद्धा देण्यात आलेलं आहे. याद्वारे युझर्सकडून काही स्पॉन्‍सर्ड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी संमती घेण्यात येते. युझर्सनी ॲग्रीमेंट स्वीकारल्यास, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काही मालवेअर इन्स्टॉल होतात. यामुळे त्यांच्या कॉम्प्युटरची गोपनीयता (Security) आणि सुरक्षितता (Safety) धोक्यात येऊ शकते. फेक विंडोज 11 इन्स्टॉलर्सशी संबंधित असे अनेक प्रकार सायबर सिक्युरिटी कंपनीने पकडले आहेत. ज्यामध्ये बहुतेक करून इतर प्रोग्रॅम डाउनलोड आणि रन होतात. त्यामुळे सर्व युझर्सने अशा फेक इन्स्टॉलरद्वारे विंडोजचे नवीन अपडेट इन्स्टॉल करण्याची घाई अजिबात नये असा सल्ला या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिला आहे.
First published: