• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Android, iPhone users, सोप्या पद्धतीने बनवू शकतात WhatsApp Stickers

Android, iPhone users, सोप्या पद्धतीने बनवू शकतात WhatsApp Stickers

व्हॉटसॲप (WhatsApp) हे सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. व्हॉटसॲपवरुन पाठवले जाणारे स्टिकर्स (Stickers) हे इमोजी (Emoji), जीआयएफ (Gif) किंवा अन्य मीडिया प्रमाणे आकर्षक असतात.

 • Share this:
  मुंबई, 27 जुलै: व्हॉटसॲप (WhatsApp) हे सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. व्हॉटसॲपवरुन पाठवले जाणारे स्टिकर्स (Stickers) हे इमोजी (Emoji), जीआयएफ (Gif) किंवा अन्य मीडिया प्रमाणे आकर्षक असतात. या स्टिकर्सच्या माध्यमातून युजर आपल्या भावना व्यक्त करत असतो. हे स्टिकर स्टेटस इमेज (Status Image) किंवा अॅनिमेटेड (Animated) असतात आणि ते अँड्रॉइड (Android) स्मार्टफोन किंवा आयफोनवरुन (iPhone) पाठवता येतात. टेलिग्राम (Telegram) आणि सिग्नल (Signal) हे मेसेजिंग अॅप्स देखील स्टिकर्स सुविधा उपलब्ध करुन देतात. मात्र त्यांचा युझर बेस व्हॉटसॲपप्रमाणे 2.5 अब्ज नाही. युजर्सला हे स्टिकर्स प्ले स्टोअर (Play Store) किंवा अॅप स्टोअरमधून डाउनलोड करता येतात. मात्र फेसबुकच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर युजर्सला व्हॉटसॲप स्टिकर पॅक (WhatsApp Sticker Pack) तयार करता येतात. स्टिकर पॅक तयार केल्यानंतर ते अॅपव्दारे व्हॉटसअॅपवर इंपोर्ट (Import) करता येते. युजर्स यात स्टॅटिक आणि अॅनिमेटेड अशा दोन प्रकारे स्टिकर्स पॅक तयार करु शकतात. तसेच यात एकाच वेळी अनेक स्टिकर्स तयार करता येतात आणि जोडताही येतात. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार व्हॉटसॲप स्टिकर पॅक कसे तयार करायचे ते जाणून घेऊया... अॅपचा वापर करुन असे बनवा व्हॉटसॲप स्टिकर पॅक अॅण्ड्रॉईड आणि आयओएसवर स्वतःचा स्टिकर पॅक तयार करण्यासाठी युजरला आपल्या डिव्हाईसवर स्पेशल स्टिकर मेकर अॅप्स इंन्स्टॉल करावी लागतील. या अॅप्सच्या मदतीने युजरला आपल्या फोनच्या स्टोरेजमधील (Storage) फोटो निवडून त्यावरुन एक स्टिकर पॅक तयार करता येईल आणि हे पॅक तयार झाल्यावर ते व्हॉटसॲपवर इंपोर्ट करता येईल. व्हॉटसॲपमध्ये स्वतःचे स्टिकर पॅक कसे तयार कराल? - सर्व प्रथम अॅप डाउनलोड करावे. त्यानंतर ते सुरु केल्यावर युजर या अॅपमध्ये एक नवे स्टिकर पॅक तयार करु शकतात. - मात्र या अॅपवर स्टिकर तयार करण्यापूर्वी युजरला स्टिकर पॅकचे नाव किंवा ऑथरचे नाव नोंदवावे लागेल. यानंतर युजर्स आपल्या फोनमधील गॅलरी किंवा गुगल ड्राईव्हवरील फोटो निवडून आपले स्वतःचे स्टिकर पॅक तयार करु शकतात. - युजर या स्टिकर पॅकमध्ये जास्तीत जास्त 30 फोटो समाविष्ट करु शकतात. हे स्टिकर अॅनिमेटेड किंवा स्टॅटिक असतील. परंतु, एका स्टिकर पॅकमध्ये अॅनिमेटेड आणि स्टॅटिक या दोन्ही गोष्टी समाविष्ट करता येणार नाही. स्टिकर पॅकसाठी फोटो समाविष्ट केल्यानंतर युजर ते क्रॉप किंवा एडिट करु शकतात. - व्हॉटसॲपमध्ये स्टिकर इंपोर्ट करण्यापूर्वी युजरने त्याला आवश्यक वाटणारे सर्व स्टिकर्स समाविष्ट केले आहेत का नाहीत हे तपासावे. कारण एकदा स्टिकर व्हॉटसॲपला इंपोर्ट केले की त्यात बदल करता येत नाही. तसेच युजरला पुन्हा एखादा नवा स्टिकर तयार करायचा असेल तर त्याला नवा पॅक तयार करावा लागतो. Keywords -
  First published: