मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

5G फोनवर Xiaomi ची नवीन ऑफर, 8GB RAM च्या मोबाईलवर तब्बल 2000 रुपयांची सूट

5G फोनवर Xiaomi ची नवीन ऑफर, 8GB RAM च्या मोबाईलवर तब्बल 2000 रुपयांची सूट

Xiaomi Offer: तुम्ही जर असाच 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शाओमी मोबाईल कंपनीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.

Xiaomi Offer: तुम्ही जर असाच 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शाओमी मोबाईल कंपनीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.

Xiaomi Offer: तुम्ही जर असाच 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शाओमी मोबाईल कंपनीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.

नवी दिल्ली, 19 जुलै: ज्याप्रकारे आपली लाईफ रोज अपडेट होत असते त्याचप्रकारे तंत्रज्ञानातही दिवसेंदिवस अपडेशन होत असतात. वेगवेगळे सॉफ्टवेअर, फोन, विविध गाड्यांमध्ये काही काळांनंतर अपग्रेडेशन झालेले दिसून येते. सध्या विविध मोबाईल कंपन्यादेखील 5G स्मार्टफोन (5G Smartphone) लाँच करण्याच्या तयारीत आहेत. शाओमी (Xiaomi), रियलमी (Realme) यांनी तर बाजारातील ट्रेंडनुसार 5G फोन लाँचही केले आहेत. त्यामुळे तुम्ही जर असाच 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शाओमी मोबाईल कंपनीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.

Mi.com या मोबाईलच्या साईटवरून मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला या ऑफरमध्ये शाओमीचा लेटेस्ट 5G स्मार्टफोन Mi 11X खरेदी करता येणार आहे. कंपनीने हा फोन 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला होता. पण सध्या तुम्हाला यावर 2000 रूपयांची सूट मिळणार आहे. म्हणजेच फक्त 27,999 रू. मध्ये तुम्ही हा 8GB रॅमचा फोन घरी घेऊन जाऊ शकता. पण हा फोन खरेदी करताना ही सूट हवी असेल तर ग्राहकांना SBI कार्ड वापरावं लागेल ज्यावर त्यांना 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

गुगल क्रोम वापरत असाल तर ब्राउझर तातडीने अपडेट करा अन्यथा चोरी होऊ शकतो तुमचा डेटा

फोनमधील फिचर्स जाणून घेऊया

फोनचा डिस्प्ले 6.67 इंच FHD+ असून कॅमेराचं रिझोल्युशन 1080x2400 पिक्सेल (Resolution) आहे. तसंच हा फोन स्क्रॅच रेसिस्टंट (Scratch Resistant) आहे. त्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन (corning gorilla glass) आहे. तर फोनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि फोन HDR10+ सपोर्टेड आहे.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह सज्ज असून त्यामध्ये Android 11 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम आहे, ज्यात कंपनीची MIUI 12 सिस्टिम बसवली आहे. ज्यामधील वेगवेगळे फीचर्स तुम्हाला आवडतील. शाओमी Mi 11X चे दोन स्टोरेज व्हेरियंट (storage variant) 6GB RAM+128GB आणि 8GB RAM+256GB स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

केवळ 49 रुपये प्रतिदिन EMI वर घरी घेऊन या ही टू-व्हीलर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

फोनमध्ये आहे 48 मेगापिक्सेल कॅमेरा

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. पहिली लेंस ही 48 मेगापिक्सेलची असून, दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड हा 8 मेगापिक्सेलसह आहे तर तिसरा मॅक्रो कॅमेरा असून तो 5 मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये 4250mAh बॅटरी असून त्यामध्ये 33W च्या फास्ट चार्जिंगची क्षमता आहे.

First published:

Tags: Mobile Phone