Home /News /technology /

भारतात Mobile Number 10 अंकीच का असतो? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण

भारतात Mobile Number 10 अंकीच का असतो? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण

मोबाइलचा नंबर 10 अंकी का असतो याचा कधी विचार केला आहे का? भारतात 10 डिजीट मोबाइल नंबर असण्यामागे सरकारचा National Numbering Plan आहे. वाचा सविस्तर

  नवी दिल्ली, 22 डिसेंबर : प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाइल फोन अतिशय महत्त्वाचा झाला आहे. आता मोबाइलचा वापर केवळ फोटो-व्हिडीओसाठी नाही, तर बँक अकाउंट, सोशल मीडिया अकाउंट, पासवर्ड्स अशा अनेक गोष्टी मोबाइलमध्ये ठेवल्या जातात. मोबाइलवरच अनेक कामंही केली जातात. पण मोबाइलचा नंबर 10 अंकी का असतो याचा कधी विचार केला आहे का? 10 Digit Mobile Number - भारतात 10 डिजीट मोबाइल नंबर असण्यामागे सरकारचा National Numbering Plan आहे. सरकारने आपल्या भारत देशाची मोठी लोकसंख्या आणि इतर गोष्टी लक्षात घेता हा प्लान लागू केला आहे. जेणेकरुन देशातील प्रत्येक मोबाइल फोन युजरला आपला स्वत:चा एक यूनिक मोबाइल नंबर मिळू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, जर देशात एक डिजीट नंबर ठेवला गेला, तर तो केवळ 10 लोकांमध्येच मिळाला असता. दोन अंकी नंबर असल्यास 100 आणि 3 अंकी नंबर असल्यास 1 हजार लोकांनी यूनिक नंबर मिळू शकतो. 4 अंकी नंबर 10 हजार, 5 अंकी नंबर 1 लाख लोकांना मिळू शकतो. अशात देशाची मोठी लोकसंख्या पाहता, सरकारने 9 अंकी नंबर सीरिज सुरू करण्याचा निर्णय घेतला.

  ऑर्डर केलं Apple Watch 6, डिलिव्हर झाला दगड; कंपनीचं उत्तर ऐकून भडकला अभिनेता

  देशात 9 अंकी सीरिज कित्येक वर्ष सुरू होती. त्यावेळी देशात 9 अंकी मोबाइल नंबर होता. परंतु सरकारने वाढती लोकसंख्या पाहता, यात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आणि 9 नंबरवरुन मोबाइल नंबर 10 अंकी करण्यात आला. यामुळे देशात 1 हजार कोटी फोन नंबर तयार होऊ शकतात.

  सावधान! पुढे धोका आहे! Driving करताना हे Mobile app तुम्हाला करेल Alert

  देशातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे 10 अंकी मोबाइल नंबरही कमी पडू शकतो. अशात येणाऱ्या काही वर्षात सरकार यातही बदल करुन 11 नंबर मोबाइल नंबर करू शकते. परंतु सध्या TRAI ने याबाबत नकार दिला असून देशातील सध्याची परिस्थिती पाहता 10 अंकी नंबर पुरेसा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Mobile Phone, Tech news

  पुढील बातम्या