मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ऑर्डर केलं Apple Watch 6, डिलिव्हर झाला दगड; कंपनीचं उत्तर ऐकून भडकला अभिनेता

ऑर्डर केलं Apple Watch 6, डिलिव्हर झाला दगड; कंपनीचं उत्तर ऐकून भडकला अभिनेता

ब्राझीलमधील अ‍ॅक्टरने Apple Watch 6 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन ऑर्डर केला. परंतु Apple Watch च्या बदल्यात त्याला दगड डिलीव्हर झाला.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 22 डिसेंबर : ऑनलाइन ऑर्डरमध्ये साबण आणि दगड आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ई-कॉमर्स साइटवरुन iPhone ऑर्डर केल्यानंतर त्या ऑर्डरच्या बदल्यात एका ग्राहकाला साबणाची पावडर आल्याचंही समोर आलं होतं. अशा गोष्टी केवळ भारतात घटतात असं वाटत असेल तर तुमचा समज चुकीचा आहे. ब्राझीलमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. रिपोर्टनुसार, ब्राझीलधील एका अभिनेत्यासह अशीच एक घटना घडली आहे. ब्राझीलमधील अ‍ॅक्टरने Apple Watch 6 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन ऑर्डर केला. परंतु Apple Watch च्या बदल्यात त्याला दगड डिलीव्हर झाला. MacMagazine च्या एका रिपोर्टनुसार, ब्राझीलियन ब्लॉगर Lo Bianco ने दिलेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध अ‍ॅक्टर Murilo Bianco ने 44mm Apple Watch Series 6 रिटेलर Carrefour वरुन ऑर्डर केला होता. 12 दिवसांनंतर त्याची ऑर्डर आली. इतके दिवस वाट पाहूनही त्याला Apple Watch मिळालं नाही. पॅकेटमध्ये आत त्याला एक दगड मिळाला.

Flipkart ने iPhone 12 ऐवजी पाठवला साबण, VIDEO पाहून व्हाल हैराण

Apple Watch 6 साठी त्या अ‍ॅक्टरने जवळपास 530 डॉलर भरले होते. भारतीय रुपयानुसार जवळपास 40000 रुपये या ऑर्डरसाठी देण्यात आले होते. इतके पैसे भरुन बॉक्स ओपन केल्यानंतर Apple Watch च्या जागी दगड डिलीव्हर झाल्याचं पाहून तो हैराण झाला. अ‍ॅक्टरने ज्यावेळी याबाबत कंपनीशी कॉन्टॅक्ट केला, त्यावेळी Carrefour ने त्याला मदत करण्यासही नकार दिला.

Amazon वरुन युवकानं ऑर्डर केला पासपोर्ट कव्हर; डिलिव्हर झालेली वस्तू पाहून बसला धक्का

मदतीसाठी नकार दिल्यानंतर संतापलेल्या अ‍ॅक्टरने कंपनीवर केस केली. त्यानंतर Carrefour ने जवळपास 1500 डॉलर देण्याची तयारी दर्शवली आहे.
First published:

Tags: Apple, Smartwatch, Tech news

पुढील बातम्या