Home /News /technology /

Indian Railway: एसी डब्बे नेहमी ट्रेनच्या मध्यभागीच का असतात? काय आहे कारण?

Indian Railway: एसी डब्बे नेहमी ट्रेनच्या मध्यभागीच का असतात? काय आहे कारण?

रेल्वेमध्ये डब्ब्यांची ही व्यवस्था का करण्यात आली आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेनमध्ये डबे बसवण्याची व्यवस्था केली आहे.

    मुंबई, 8 मे : तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की सामान्य ट्रेनमध्ये एसी डबे (Railway AC Coach) नेहमी मध्यभागी बसवले जातात. बहुतेक मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये डब्यांची व्यवस्था सारखीच असते. राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत यांसारख्या गाड्या वगळता इतर बहुतेक एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये इंजिन नंतर जनरल बोगी, नंतर स्लीपर क्लास, नंतर एसी बोगी आणि शेवटी जनरल क्लास आणि नंतर गार्ड बॉक्स असतात. याचा अर्थ असा की कोणत्याही ट्रेनमध्ये जनरल डब्बे नेहमी ट्रेनच्या दोन्ही बाजूला असते आणि एसी किंवा अप्पर क्लासचे डबे नेहमी ट्रेनच्या मध्यभागी असतात. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रेल्वेमध्ये डब्ब्यांची ही व्यवस्था (Train Coach Arrangement) का करण्यात आली आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेनमध्ये डबे बसवण्याची व्यवस्था केली आहे. कोणत्याही ट्रेनचे डिझाईन अशा प्रकारे तयार केले जाते की वरच्या श्रेणीचे डबे आणि लेडीज डब्बा इत्यादी ट्रेनच्या मध्यभागी ठेवले जातात तर गर्दीच्या सामान्य बोगी ट्रेनच्या दोन्ही बाजूला ठेवल्या जातात. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी हे करण्यात आले आहे. आधार कार्ड हरवलं तरी टेन्शन नाही, मोबाईलमध्ये डाउनलोड करा mAadhaar app; मिळणार अनेक फायदे सहसा रेल्वे स्थानकाचे एक्झिट गेट मध्यभागी बनवले जाते. ट्रेन स्टेशनवर थांबल्यानंतर, एसी कोचमधून प्रवास करणारे प्रवासी सहजपणे स्टेशनमध्ये प्रवेश करू शकतात किंवा बाहेर पडू शकतात. सामान्य डबे रेल्वेच्या इंजिनाजवळ किंवा गार्डच्या डब्याजवळ असतात, त्यामुळे त्यामध्ये जाणाऱ्या किंवा उतरणाऱ्या लोकांची गर्दी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर विभागली जाते. यामुळे स्थानक आणि ट्रेनची सुरक्षा व्यवस्था राखण्यास मदत होते. नवीन घर खरेदीदारांना झटका; HDFC बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ, EMI वाढणार सामान्य किंवा स्लीपर क्लासच्या डब्यात जास्त गर्दी असते, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. समजा सामान्य डबे मध्यभागी लावले तर त्यामुळे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करणारी सारी यंत्रणाच विस्कळीत होईल. मध्यभागी एक सामान्य डबा बसवला तर ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ शकते आणि बाकीचे लोक दोन्ही दिशेने जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनच्या दोन्ही टोकांना जनरल डबे बसवण्यात आले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Indian railway, Railway, Train

    पुढील बातम्या