मुंबई, 7 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईन्ट्सची वाढ केल्यानंतर आता सर्वच बँकांनी हळूहळू आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, IDBI बँक, पंजाब नॅशनल बँकेनंतर आता खासगी क्षेत्रातील मोठ्या HDFC बँकेनेही आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये 30 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.30 टक्क्यांची वाढ केली आहे. नवे दर 9 मे पासून लागू होतील. RPLR वाढल्याने कंपनीचे गृहकर्ज आता महाग होणार आहे. यापूर्वी 2 मे रोजी HDFC ने RPLR मध्ये 5 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. आता बँकेचा गृहकर्जाचा किमान व्याजदर 7 टक्के असेल. यापूर्वी 1 मे रोजी HDFC ने RPLR मध्ये वाढ केली होती. ही वाढ 5 बेसिस पॉईंट्सनी करण्यात आली, त्यानंतर किमान व्याज दर 6.70 टक्क्यांवरून 6.75 टक्के झाला. अलिबाबा कंपनीला नावाच्या गोंधळामुळे मोठा फटका; काही मिनिटात 26 अब्ज डॉलर्सचा फटका किती असेल व्याजदर? घर खरेदी करणाऱ्याचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असल्यास, किमान व्याजदर 7 टक्के असेल. महिलांसाठी 30 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील किमान व्याज दर 7.05 टक्के आणि पुरुष आणि इतरांसाठी 7.10 टक्के आहे. 30-75 लाखांच्या गृहकर्जावरील व्याजदर महिलांसाठी 7.30 टक्के आणि इतरांसाठी 7.35 टक्के झाला आहे. महिलांसाठी किमान व्याजदर 7.40 टक्के आणि इतरांसाठी 75 लाखांपेक्षा जास्त गृहकर्जासाठी 7.45 टक्के करण्यात आला आहे.
HDFC increases its Retail Prime Lending Rate on Housing Loans, on which its Adjustable Rate Home Loans are benchmarked by 30 basis points with effect from May 09, 2022. pic.twitter.com/cOoBoIM1Q8
— ANI (@ANI) May 7, 2022
EPFO व्याजाच्या पैशांसाठी यावर्षी वाट पाहावी लागणार नाही? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना पैसे लवकर मिळण्याची शक्यता EMI वाढणार RPLR मध्ये वाढ झाल्यामुळे, गृहकर्जाच्या एकूण व्याजदरात 30 बेसिस पॉईंट्सची वाढ झाली आहे, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांचा EMI वाढेल. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर अनेक बँकांनी गृहकर्जासाठी आरपीएलआर वाढवला आहे. ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि IDBI बँकांनी त्यांच्या बाह्य बेंचमार्क कर्जदरात वाढ केली आहे. बँकांनी व्याजदरात वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग झाली. सर्वसामान्यांवर कर्जाच्या ईएमआयचा बोजा वाढला.