मराठी बातम्या /बातम्या /मनी /आधार कार्ड हरवलं तरी टेन्शन नाही, मोबाईलमध्ये डाउनलोड करा mAadhaar app; मिळणार अनेक फायदे

आधार कार्ड हरवलं तरी टेन्शन नाही, मोबाईलमध्ये डाउनलोड करा mAadhaar app; मिळणार अनेक फायदे

आधार गहाळ होण्याची भीती वाटत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी UIDAI ने एक अॅप mAadhaar App हे लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड सहज सेव्ह करू शकता.

आधार गहाळ होण्याची भीती वाटत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी UIDAI ने एक अॅप mAadhaar App हे लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड सहज सेव्ह करू शकता.

आधार गहाळ होण्याची भीती वाटत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी UIDAI ने एक अॅप mAadhaar App हे लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड सहज सेव्ह करू शकता.

मुंबई, 8 मे : आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) हे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. शैक्षणिक कामापासून, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापर्यंत, बँक खाते उघडण्यापर्यंत सर्व आवश्यक कामांसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. आधार कार्ड योजना 2009 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने (Central Gvernment) सुरू केली होती. आधार कार्ड हे इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे आहे कारण त्यात आपली बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. आधार कार्ड बनवताना आपल्या हातांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे रेटिना स्कॅन देखील घेतले जातात.

आधार कार्डच्या वाढत्या वापरामुळे ते कुठेतरी हरवले तर मोठा त्रास होऊ शकतो. तुम्हालाही तुमचा आधार गहाळ होण्याची भीती वाटत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी UIDAI ने एक अॅप mAadhaar App हे लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड सहज सेव्ह करू शकता. mAadhaar अॅपचे फायदे आणि ते कसे वापरायचे याबद्दल माहिती घेऊयात.

आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? चेक करा प्रोसेस

mAadhaar अॅप वापरण्याचे फायदे

तुमच्या मोबाईलमध्ये mAadhaar अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही आधारमध्ये टाकलेला पत्ता सहज बदलू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे बायोमेट्रिक या अॅपवर सहज लॉक ठेवू शकता. याच्या मदतीने तुम्ही या अॅपद्वारे तुमची केवायसी प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकता. या अॅपमध्ये आधार सेव्ह करून तुम्ही ऑफलाइन मोडमध्येही ही सेवा वापरू शकता.

नवीन घर खरेदीदारांना झटका; HDFC बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ, EMI वाढणार

mAadhaar अॅपवर अशी प्रोफाइल तयार करा

>> mAadhaar अॅपवर प्रोफाइल तयार करण्यासाठी, प्रथम तुम्ही नोंदणी आधार पर्यायावर क्लिक करा.

>> यानंतर तुम्ही 4 अंकी पासवर्ड तयार करा.

>> तुम्हाला आधार तपशील विचारला जाईल, जो भरला पाहिजे.

>> तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते एंटर करा.

>> तुमचा आधार क्रमांक mAadhaar अॅपमध्ये नोंदणीकृत होईल.

>> मेनूमधील My Aadhaar टॅबवर क्लिक करा.

>> येथे 4 क्रमांकाचा पिन एंटर करा.

>> तुमच्या समोर आधारकार्ड ओपन होईल.

First published:
top videos

    Tags: Aadhar Card, Government apps