मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram वर फोटो एडिट करणं पडेल महागात; या देशात नव्या कायद्यानुसार जेलसह दंडाचीही तरतूद

Instagram वर फोटो एडिट करणं पडेल महागात; या देशात नव्या कायद्यानुसार जेलसह दंडाचीही तरतूद

इन्स्टाग्रामवर फोटो एडिट केल्यास थेट जेलमध्ये पाठवण्याचा कायदा नॉर्वेमध्ये आणण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार, असं केल्यास मोठा दंडही भरावा लागू शकतो. नॉर्वेचा हा कायदा फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, स्नॅपचॅटसाठीही लागू होणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जुलै: इन्स्टाग्रामवर (Instagram) फोटो एडिट (Photo Edit) करणं महागात पडू शकतं. इन्स्टाग्रामवर फोटो एडिट केल्यास थेट जेलमध्ये पाठवण्याचा कायदा नॉर्वेमध्ये आणण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार, असं केल्यास मोठा दंडही भरावा लागू शकतो. नॉर्वेचा हा कायदा फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, स्नॅपचॅटसाठीही लागू होणार आहे.

नॉर्वेने मार्केटिंग अॅक्ट अंतर्गत हा कायदा आणला असून केवळ जाहिरातीवाल्या पोस्टसाठी लागू करण्यात आला आहे. नॉर्वेच्या मिनिस्ट्री ऑफ चिल्ड्रेन अँड फॅमेली अफेअर्सद्वारा एक लेबल डिझाईन करण्यात आलं आहेत. हे लेबल नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जाहिरातींच्या पोस्टवर लावलं जाईल. लेबलमध्ये असं लिहिलं जाईल, की यात आकार, स्किन आणि शेपमध्ये बदल करण्यात आले आहेत.

जाहिरातींमध्ये (Advertising) वस्तूची विक्री करण्यासाठी अनेकदा विचित्र गोष्टी किंवा अतिशयोक्ती दाखवली जाते. एखाद्याचे ओठ मोठे दाखवले जातात, तर कधी एखाद्याचं शरीर अधिकच पीळदार दाखवलं जातं. जर जाहिरातींमध्ये अशाप्रकारे बनावट बदल करण्यात आले, तर नव्या कायद्यानुसार, त्यांना या बाबी सर्वांसमोर आणव्या लागतील, सार्वजनिक कराव्या लागतील. कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

चीनमधून भारतात होत होता Online Fraud, सायबर क्राईमचा प्रकार पाहून पोलिसही हैराण

2017 मध्ये युके रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बनावटगिरी दाखवून लोकांची फसवणूक होता कामा नये. नव्या कायद्यानुसार आता असे बदल केल्यास दंडासह जेलही होऊ शकते.

Online Classमध्ये कपलचं सेक्स; कॅमेरा सुरू राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि....

Instagram वर एखाद्या युजरने रिअॅलिटी फिल्टरचा वापर केल्यास, हे अॅप स्क्रिनवर नवं लेबल आकार, स्किन आणि शेपमध्ये बदल करण्यात आल्याचं डिस्प्ले करेल. इतकंच नाही, तर इन्स्टाग्रामने कॉस्मेटिक प्रमोट करणारे इफेक्ट देखील प्रतिबंधित केले आहेत. तसंच जाहिरातींमध्ये मिसलीडिंग फिल्टरचा वापर न करण्याचं सांगण्यात आलं आहे. अशा कोणत्याही फिल्टरचा वापर करू नये, ज्यामुळे जाहिरातींचा प्रभाव अतिशयोक्ती करणारा असेल.

First published:

Tags: Instagram, Instagram post, Tech news