मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! हे एक App डाउनलोड केल्यानं रिटायर्ड ऑफिसरला लागला 4 लाखांचा गंडा, काय घडलं नेमकं

सावधान! हे एक App डाउनलोड केल्यानं रिटायर्ड ऑफिसरला लागला 4 लाखांचा गंडा, काय घडलं नेमकं

विमानाच्या तिकीटाचं रिफंड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिटायर्ड ऑफिसरला तब्बल 4 लाखांचा फटका बसला आहे. सायबर फ्रॉडच्या दररोजच्या नव्या प्रकरणांमुळे इंटरनेटचा अतिशय सावधपणे वापर करणं आवश्यक आहे.

विमानाच्या तिकीटाचं रिफंड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिटायर्ड ऑफिसरला तब्बल 4 लाखांचा फटका बसला आहे. सायबर फ्रॉडच्या दररोजच्या नव्या प्रकरणांमुळे इंटरनेटचा अतिशय सावधपणे वापर करणं आवश्यक आहे.

विमानाच्या तिकीटाचं रिफंड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिटायर्ड ऑफिसरला तब्बल 4 लाखांचा फटका बसला आहे. सायबर फ्रॉडच्या दररोजच्या नव्या प्रकरणांमुळे इंटरनेटचा अतिशय सावधपणे वापर करणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : मुंबईतील एका रिटायर्ड IAS ऑफिसरसह ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे. विमानाच्या तिकीटाचं रिफंड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिटायर्ड ऑफिसरला तब्बल 4 लाखांचा फटका बसला आहे. सायबर फ्रॉडच्या दररोजच्या नव्या प्रकरणांमुळे इंटरनेटचा अतिशय सावधपणे वापर करणं आवश्यक आहे.

तिकीट रद्द करण्याच्या नावे फसवणूक -

या रिटायर्ड ऑफिसरने महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केलं आहे. सध्या त्यांचं वय जवळपास 70 वर्ष आहे. त्यांनी आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं एयर तिकीट बुकिंग केलं होतं. हे तिकीट राउंड ट्रिप अर्थात जाण्या-येण्यासाठीचं होतं.

परंतु काही कारणाने त्यांचा प्लॅन बदलला आणि बुकिंग रद्द करावं लागलं. टाइम्स ऑफ इंडियानुसार, तिकीट रद्द केल्यानंतर त्यांनी रिफंडची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी ज्या ट्रॅवल कंपनीच्या माध्यमातून बुकिंग केलं होतं, त्याला ऑनलाईन सर्च केलं. त्यांना एक वेबसाइट मिळाली. हीच वेबसाइट खरी समजून त्यांनी तिकडे संपर्क केला परंतु ती वेबसाइट बनावट-फेक निघाली.

क्रेडिट कार्ड डिटेल्स -

या वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर त्यांनी कॉल केल्यानंतर समोरुन त्यांना त्यांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स शेअर करण्यास सांगितले, जेणेकरुन त्यांचं रिफंड त्यात ट्रान्सफर करता येईल. परंतु त्यांनी आधी कोणतेही डिटेल्स कोणालाही देऊ नये, याबाबत ऐकलं असल्याने, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. परंतु फ्रॉड करणारे अशा प्रकारची स्थिती तयार करतात, की एक प्रकारचा प्लॅन न झाल्यास आणि दुसऱ्या पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

क्रेडिट कार्ड डिटेल्स या अधिकाऱ्याने न दिल्याने फ्रॉड करणाऱ्यांनी त्यांना फसवणुकीसाठी एक स्क्रिन शेअरिंग अॅप डाउनलोड करण्यासाठी सांगितलं. कदाचित त्यांनी अशा फ्रॉडबाबत ऐकलं नसावं आणि त्यांनी App डाउनलोड केलं. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर त्यांना 4 लाख 50 हजार रुपयांचा फ्रॉड झाला.

App डाउनलोड झाल्यानंतर नेमकं काय झालं?

स्क्रिन शेअरिंग App चा अर्थ तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देणं. फ्रॉड करणाऱ्यांकडे फोनचा कंट्रोल गेल्यानंतर त्यांना फोनमधील सर्व गोष्टी, लॉगइन-पासवर्ड पाहिले असतील आणि अकाउंटमधून चार लाख रुपये उडवले. आता या प्रकरणी अधिकाऱ्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सावधान! तुमचा Smartphone खूपच लवकर डिस्चार्ज होतो? त्यामध्ये असू शकतो Virus

अशी घ्या काळजी -

- आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सची माहिती कोणालाही देऊ नका.

- कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरुन फोनमध्ये कोणतंही App इन्स्टॉल करू नका.

- कोणत्याही व्यक्तीने लिंक शेअर केल्यास ती ओपन करू नका.

- कस्टमर केअरवर कॉल करण्याआधी नंबर तपासा. इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाइटवर विश्वास न ठेवता आधी त्या साइटचा तपास करा. कस्टमर केअर असल्याचं सांगत मोठी फसवणूक केली जाते.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Tech news