नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : WhatsApp लवकरच लाखो जुन्या स्मार्टफोनवर कायमसाठी बंद होणार आहे. काही iPhone आणि काही Android डिव्हाईसेसमध्ये हे चॅट App कायमसाठी लॉक केलं जाईल. अशा युजर्सला आपल्या फोनचं सॉफ्टवेअर अपडेट करावं लागेल किंवा नवा फोन खरेदी करावा लागेल. तुमचा फोन अपडेटसाठी अतिशय जुना असेल, तर नवा फोन खरेदी करण्याची आवश्यकता असेल. रिपोर्टनुसार 40 हून अधिक वेगवेगळ्या स्मार्टफोनवर WhatsApp बंद होईल.
1 नोव्हेंबरपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट करण्याची मुदत आहे. त्यानंतर तुमच्या अतिशय जुन्या स्मार्टफोनवर WhatsApp काम करणार नाही. कंपनी जुन्या Android आणि iphone मधून WhatsApp Support हटवणार आहे. अँड्रॉईड युजर्सला त्यांचा फोन Android 4.1 किंवा त्याहून लेटेस्ट वर्जन चालवावा लागेल आणि iPhone युजर्सला iOS 10 किंवा त्यानंतरच्या वर्जनचा वापर करावा लागेल.
काय आहे कंपनीचं म्हणणं?
अधिकृत WhatsApp सपोर्ट पेजवर कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. WhatsApp आता Android 4.1 आणि त्याहून नव्या वर्जनला सपोर्ट करेल. याचा अर्थ WhatsApp अशा Android Phone वर काम करेल, जे 2013 नंतर जारी केले गेले आहेत. ज्यांच्याकडे जुने स्मार्टफोन्स आहेत, त्यांना नोव्हेंबरनंतर अपडेट मिळणार नाही. WhatsApp असं करणारा पहिलाच डेव्हलपर नाही. याआधीही अनेक डेव्हलपर्सनी Android च्या जुन्या वर्जनसाठी सपोर्ट बंद केलं आहे.
जुने स्मार्टफोन्स असल्यास काय कराल?
जर तुमच्याकडे 2013 किंवा त्यानंतरचा स्मार्टफोन असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे LG Optimus L3, Samsung Galaxy SII, Galaxy Core, ZTE Grand S Flex आणि Huawei Ascend G740 सारखे अतिशय जुने स्मार्टफोन असतील, तर त्या फोनला WhatsApp Update मिळणार नाही. iPhone 4 किंवा त्याहून जुनं वर्जन असल्यास अशा युजर्सला WWhatsApp वापरता येणार नाही. WhatsApp आता 1 नोव्हेंबरपासून OS 4.0.4 आणि जुन्या OS वर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला सपोर्ट करणार नाही. जुना फोन असल्यास युजर्सनी नव्या डिव्हाईसवर स्विच करा किंवा तुमची चॅट हिस्ट्री सेव्ह करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp alert, Whatsapp News, WhatsApp user