नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया App आहे. मागील काही दिवसांपासून कंपनीकडून सतत काही नवे फीचर्स आणि अपडेट आणले जात आहेत. त्यामुळे WhatsApp सतत चर्चेत आहे. अनेकदा WhatsApp वर अशा मेसेज किंवा चॅट्सची गरज भासते, जे तुमच्याकडून डिलीट झाले आहेत. एका ट्रिकद्वारे तुम्ही डिलीट केलेले मेसेज रीट्रीव करू शकता.
डिलीट केलेल मेसेज असे करा रिकव्हर -
जर तुम्ही एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट केला असेल, तर तो क्लाउडद्वारे रिकव्हर करता येऊ शकतो. WhatsApp वर मेसेज आणि चॅट्स बॅकअप करण्याचा पर्याय असतो. ज्याद्वारे तुमचे मेसेज WhatsApp Cloud मध्ये Backup होतील.
Android Smartphone वर हा बॅकअप दररोज रात्री 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान होतो. यावेळी तुमचा फोन हरवला, तुटला किंवा मेसेज चॅट्स डिलीट झाले, तर या WhatsApp Backup द्वारे ते रिकव्हर करू शकता.
विना चॅट बॅकअप असे रीट्रीव करा मेसेज -
जर तुम्ही चॅट बॅकअपचा वापर करत नसाल, आणि अँड्रॉईड स्मार्टफोन युजर असाल, तर तुम्ही स्मार्टफोनच्या लोकल बॅकअपमधून चॅट्स आणि मेसेज रीट्रीव करू शकता.
यासाठी Android Smartphone च्या फाइल मॅनेजरमध्ये जावं लागेल. अँड्रॉईड फोल्डरमध्ये WhatsApp Folder शोधावं लागेल आणि त्यात डेटाबेस फोल्डरवर जावं लागेल. इथे जुन्या बॅकअप फोल्डरचं नाव बदलावं लागेल. ‘msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12’ वरुन बदलून ‘msgstore.db.crypt12’ करावं लागेल. अशाप्रकारे लास्ट बॅकअपपर्यंतचे मेसेज WhatsApp वर रीस्टोर होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp chat, WhatsApp features, WhatsApp user