नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : WhatsApp आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी नेहमी काही नवे बदल, अपग्रेड करत असतं. आता WhatsApp ने एका नव्या फीचरची सुरुवात केली आहे. या फीचरद्वारे ग्रुप कॉलमध्ये मध्येच जॉइन करता येईल. कंपनीने App मध्ये असं फीचर जोडण्याची घोषणा केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या फीचरची मोठी चर्चा होती. या फीचरच्या मदतीने युजर्स मिस झालेला व्हिडीओ किंवा वॉईस कॉल नंतर जॉइन करू शकतात. एखाद्या युजरला कॉल आला आणि तो मिस झाला, तर नंतर कॉल सुरुच असेल, तर तो या ग्रुप व्हिडीओ किंवा वॉईस कॉलला मध्येच जॉइन करू शकतो. जर कॉल सुरू असेल, तर तो ड्रॉप-ऑप करुन पुन्हा जॉइन करू शकतात. काही आठवड्यांपूर्वी WhatsApp ने ही सुविधा सुरू केली आहे. हे फीचर अशा लोकांसाठी अतिशय उपयोगी ठरू शकतं, ज्यांना ग्रुप व्हिडीओ कॉल किंवा वॉईस कॉलची सर्वात जास्त गरज असते. अनेकदा कॉल मध्येच कट करता येतो. परंतु पुन्हा जॉइन करण्याचा कोणताही पर्याय मिळत नव्हता.
WhatsApp Users साठी Bad News; आता Chat Backup साठी येऊ शकते ही समस्या
हीच बाब लक्षात घेता कंपनीने हे फीचर लाँच केलं आहे. युजर्स आता सहजपणे कॉल टॅबमध्ये जाऊन मिस झालेला व्हिडीओ किंवा वॉईस कॉल जॉइन करू शकतात. कॉल सुरुच असेल, तर आता थेट पुन्हा जॉइन करता येणार आहे.
ऑर्डर केलं एक आलं भलतंच! आता फक्त एक काम करा आणि Online Shopping मधील घोळ टाळा
यात कॉल इन्फो स्क्रिनही दिसेल. जिथे किती लोक कॉलवर आहेत आणि किती लोकांना इनवाइट केलं गेलं होत, हे समजेल. जर Ignore वर क्लिक केलं, तर कॉल टॅबद्वारे पुन्हा कॉल जॉइन करू शकता. कंपनीने जॉइनेबल कॉल रोलआउट करण्याची सुरुवात केली आहे.