नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp काही महिन्यांपासून वेगवेगळे अनेक अपडेट्स, नवे फीचर्स देत आहेत. आता WhatsApp ने आणखी एक नवं अपडेट आणलं आहे. WhatsApp च्या Last Seen फीचरद्वारे युजर ते कधी ऑनलाइन होते ही माहिती लपवू शकतात. याच फीचरमध्ये आता एक नवं अपडेट देण्यात आलं आहे.
Last Seen फीचर Update -
WhatsApp ने काही दिवसांपूर्वी लास्ट सीन फीचरमध्ये बदल करणार असल्याचं म्हटलं होतं. हे बदल-अपडेट WhatsApp च्या बीटा वर्जनसाठी जारी करण्यात आलं आहे. या नव्या अपडेटअंतर्गत युजर्सला असे काही कॉन्टॅक्ट सिलेक्ट करता येतील, ज्यांच्यापासून त्यांना आपलं लास्ट सीन Hide करायचं आहे.
आतापर्यंत Everyone, My Contact आणि Nobody असे तीन पर्याय युजर्सकडे होते. आता नव्या अपडेटमध्ये My Contacts Accept असा पर्यायही मिळणार आहे. म्हणजेच सर्वांसाठी लास्ट सीन बंद किंवा ओपन न करता काही निवडक लोकांसाठी आता Last Seen बंद किंवा ओपन ठेवता येऊ शकतं.
सध्या हे अपडेट टेस्टिंग फेजमध्ये आहे. हे फीचर सध्या सर्वांनाच वापरता येणार नाही. जर तुम्ही WhatsApp च्या बीटा वर्जनचा वापर करत असाल, तर हे अपडेट तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर सर्वांसाठी हे नवं अपडेट जारी केलं जाईल.
या फीचरचं नवं अपडेट आल्यानंतर जर तुम्ही याचा वापर केला, तर तुम्ही ज्या कॉन्टॅक्टसाठी लास्ट सीन ऑफ कराल, त्या कॉन्टॅक्टचंही लास्ट सीन तुम्ही पाहू शकणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp New Feature, WhatsApp user