नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅप (whatsapp features) कंपनीनं Delete For Everyone या फीचर्समध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. कारण WaBetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप चॅट करत (change the features of Delete For Everyone on WhatsApp) असताना अनेकदा चुकुन पडलेला मेसेज डिलीट करण्याचं फीचर असलेल्या (delete for everyone) या ऑप्शनची टाइम लिमिट वाढवण्यात येऊ शकते. हा पर्याय युजर्सला 2017 साली देण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीनं यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळं आता युजर्सने चुकुन किंवा अनावधानानं पाठवलेल्या मेसेजला डिलीट करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. याआधी मेसेज डिलीट (whatsapp delete for everyone time limit 2021) करण्यासाठीची वेळ 7 मिनिटांची होती त्यानंतर व्हॉट्सअॅपने या फीचर्सची वेळ वाढवून एका तासांहून अधिक वेळेसाठी वाढवली होती. परंतु आता व्हॉट्सअॅपवर Delete For Everyone या फीचर्सची वेळमर्यादा ही कायमस्वरूपी काळासाठी असणार आहे.
फीचर्सवर अजून सुरू आहे काम
सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार हा फीचर v2.21.23.1 अँड्रॉईड बीटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आलं होतं. समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅप या फीचर्सवरती काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु WhatsApp आता हे फीचर्स युजर्ससाठी कधीपर्यंत लागू करणार याची माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळं युजर्सला काही काळ या फीचर्ससाठी वाट पाहावी लागणार आहे.
सध्या मेसेज डिलीट करण्यासाठी मिळतेय एक तासाची वेळ
सध्या एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर एका तासाची वेळ देण्यात आलेली आहे. त्या वेळेतच युजर्सला चुकीचे मेसेजेस डिलीट करता येऊ शकतात. त्याशिवाय मेसेज डिलीट केल्यानंतर त्याचंही विवरण चॅटिंगमध्ये येत असते. WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टमध्ये WhatsApp च्या iOS व्हर्जनमध्ये युजर्सला Video पाहताना मेसेजिंगच्या सुविधेचाही आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर v2.21.220.15 iOS या बीटा व्हर्जन असलेल्या स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp chat, WhatsApp features