मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता WhatsApp वरही मिळणार Cashback! वाचा काय आहे हे भन्नाट फीचर

आता WhatsApp वरही मिळणार Cashback! वाचा काय आहे हे भन्नाट फीचर

WhatsApp चं हे नवं फीचर Payment सर्विस WhatsApp Payment शी संबंधित आहे. हे फीचर रोलआउट झाल्यानंतर युजर्सला WhatsApp द्वारे UPI Payment केल्यानंतर कॅशबॅक मिळेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरद्वारे युजरला कॅशबॅकचा फायदा होईल. WhatsApp चं हे नवं फीचर Payment सर्विस WhatsApp Payment शी संबंधित आहे. हे फीचर रोलआउट झाल्यानंतर युजर्सला WhatsApp द्वारे UPI Payment केल्यानंतर कॅशबॅक मिळेल.

इतका मिळेल Cashback -

WABetaInfo ने या फीचरचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 'Get cashback on your next payment' आणि 'Tap to get started' अशा मेसेजसह एक Gift Icon ही बनलेला दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर भारतात UPI Payments साठी रिलीज होईल आणि कंपनी एका पेमेंटसाठी युजर्सला 10 रुपये कॅशबॅक ऑफर करेल.

WhatsApp चा नवा ‘₹’ सिंबॉल पाहिलात का? यावर Click करून सहज पाठवता येणार पैसे

आपल्या पेमेंट फीचरशी अधिकाधिक युजर्स जोडले जावेत, यासाठी कंपनी कॅशबॅक फीचर आणण्याच्या तयारीत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp चं हे नवं फीचर Cashback नावाने रोलआउट होईल. सध्या या फीचरवर काम सुरू असून अद्याप ते सुरुवातीच्या फेजमध्ये आहे. हे फीचर बीटा युजर्ससाठीही रोलआउट केलं गेलेलं नाही.

Wabetainfo रिपोर्टनुसार, कॅशबॅक सर्वांना मिळेल, की केवळ असे युजर्स ज्यांनी WhatsApp वर कधीही पेमेंट केलं नाही अशा पहिल्यांदा WhatsApp Payment चा वापर करणाऱ्या युजर्सला मिळेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp Payment वर 10 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. ही रक्कम फीचर रोलआउट झाल्यानंतर बदलली जाऊ शकते. हे फीचर कधीपर्यंत लाँच होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली, तरी लवकरच ही कॅशबॅकची सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती आहे.

First published:

Tags: Tech news, Whatsapp New Feature, Whatsapp News, Whatsapp pay