मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp चा नवा ‘₹’ सिंबॉल पाहिलात का? यावर Click करून सहज पाठवता येणार पैसे

WhatsApp चा नवा ‘₹’ सिंबॉल पाहिलात का? यावर Click करून सहज पाठवता येणार पैसे

भारतातील आघाडीची मेसेंजर सर्व्हिस असणाऱ्या (WhatsApp brings new feature of money transfer in India) व्हॉट्सअपने आता मनी ट्रान्सफर करण्यासाठी ₹ हा सिम्बॉल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारतातील आघाडीची मेसेंजर सर्व्हिस असणाऱ्या (WhatsApp brings new feature of money transfer in India) व्हॉट्सअपने आता मनी ट्रान्सफर करण्यासाठी ₹ हा सिम्बॉल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. यानुसार आता चॅट कम्पोझरमध्ये ग्राहकांना (Rupee Symbol in Chat Composer) रुपयाचा सिंबॉल दिसायला सुरुवात झाली आहे. त्यावर क्लिक करून चॅटिंग करता करता ग्राहक एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतील, अशी घोषणा WhatsAPP कडून करण्यात आली आहे.

अशी असेल सुविधा

व्हॉट्सअपवरून ज्याप्रमाणे मेसेजेस, फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले जातात, त्याचप्रमाणे आता पैसेही ट्रान्सफर करता येणार आहेत. त्यासाठी चॅट कम्पोझरमध्ये रुपयाचा सिम्बॉल देण्यात येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती रुपये ट्रान्सफर करायचे आहेत, ती रक्कम विचारली जाईल. रक्कम टाईप करून सेंड ऑप्शन क्लिक केल्यावर तुमच्या खात्यातून ती रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा होऊ शकेल.

क्यूआर कोड स्कॅनिंगचीही सोय

व्हॉट्सअपच्या चॅट कम्पोझरमध्ये सध्या ज्या ठिकाणी कॅमेराचा आयकॉन असतो, तो ओपन केल्यानंतर त्यातून क्यूआर कोड स्कॅन करता येईल. हा कोड वापरूनही पैसे ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअप नंबर आणि क्यूआर कोड स्कॅनिंग असे दोन्ही पर्याय भारतीयांना लवकरच उपलब्ध होणार असल्याची घोषणा व्हॉट्सअपनं ‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल 2021’मध्ये केली आहे.

हे वाचा - 50MP गिंबल कॅमेरासह Vivo X70 Pro+, X70 Pro भारतात लाँच, काय आहे किंमत

भारतात डिजिटल क्रांतीचा वाव

भारतात डिजिटल क्रांतीला मोठा वाव असल्याची प्रतिक्रिया व्हॉट्सअप इंडियाच्या पेमेंट विभागाचे संचालक मनिष महात्मे यांनी दिली आहे. भारतात अद्यापही 80 टक्क्यांपेक्षा अधिक व्यवहार हे कॅशमध्ये होतात. विशेषतः ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार कमी प्रमाणात आहेत. मात्र व्हॉट्सअपचा वापर ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात होत असल्यामुळे या निमित्ताने डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भारतीयांना जर पैसे ट्रान्सफर करण्याचा सोपा आणि सुटसुटीत मार्ग मिळाला, तर ते त्याला चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास व्हॉट्सअपने  व्यक्त केला आहे. लवकरच हे फिचर्स भारतीयांना मिळणार आहे.

First published:

Tags: Money, What's app, Whats app news