Home /News /technology /

WhatsApp मुळे जास्त इंटरनेट डेटा जातोय? वापरा या टिप्स

WhatsApp मुळे जास्त इंटरनेट डेटा जातोय? वापरा या टिप्स

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

व्हॉटसअॅपवर फोटो, व्हिडिओ पाठवल्याने इंटरनेट डेटा जास्त खर्च होतो. त्यासाठी काही सेटिंग अॅपमध्ये आहे ते केल्यास इंटरनेट डेटा कमी वापरला जाईल.

    जगात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅप सतत नवनवे अपडेट देत असतं. सुरुवातीला फक्त मेसेजपुरतं मर्यादित असलेलं व्हॉटसअॅप आता फोटो-व्हिडिओ, डॉक्युमेंट फाइल्स पाठवण्यासाठीही उपयुक्त आहे. इतकंच काय कॉन्टॅक्ट आणि लोकेशनही पाठवता येतं. मात्र यामुळे इंटरनेट डेटा जास्त खर्च होतो. त्यासाठी काही सेटिंग अॅपमध्ये आहे ते केल्यास इंटरनेट डेटा कमी वापरला जाइल. सध्या एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर पत्ता न सांगता थेट लोकेशन व्हॉटसअॅपवर पाठवलं जातं. अनेकांना याची माहिती नसते. चॅट विंडोमध्ये फोटो-व्हिडिओ पाठवतो त्या ठिकाणी लोकेशनचा पर्यायही दिसतो. त्यावर क्लिक करताच तुम्हाला जीपीएस लोकेशन पाठवू शकता. इथं ते किती वेळ सुरू रहावं यासाठीही पर्याय दिला जातो. याचसोबत कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट फाइल्सही पाठवता येतात. युजर्स स्टेटसला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. हे फोटो, व्हिडिओ आवडताच इतरांकडून ते पाठवण्याची विनंती केली जाते. अनेकदा फोटोंचे स्क्रिनशॉट काढले जातात. मात्र व्हिडिओ घेण्यासाठी कोणताच ऑप्शन नाही. तुम्हाला यासाठी एक सेटिंग फोनमध्ये करावं लागेल. स्मार्टफोनमध्ये फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्येShow hidden File असा एक पर्याय असतो. तो निवडल्यानंतर फोनमध्ये तात्पुरत्या स्वरुपासाठी डाउनलोड होणाऱ्या फाइल्सचे फोल्डर दिसतात. हे सेटिंग केल्यानंतर तुम्ही WhatsApp/Media या फोल्डरमध्ये .Statuses अशा नावाचा फोल्डर दिसेल. त्यामध्ये सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह झालेले असतात. सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं फेसबुक मेसेंजरप्रमाणे व्हॉटसअॅपला मेसेज आल्यावर फ्लोटिंग नोटिफिकेशन मिळण्याची सुविधाही मिळते. त्यासाठी व्हॉटसअॅप बबल अॅपचा वापर करावा लागेल. ते इन्स्टॉल केल्यानंतर व्हॉटसअॅप मेसेज मिळाल्यानंतर फेसबुक मेसेंजरप्रमाणेच फ्लोटिंग नोटिफिकेशन मिळेल. Alert: तुमच्या बँकिंग ट्रांझेक्शन्सवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्डची होत आहे चोरी! व्हॉटसअॅपवर टेक्स्ट मेसेज केल्याने जास्त डेटा जात नाही. मात्र, फोटो-व्हिडिओ सेंड केल्याने तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी जास्त इंटरनेट डेटा जातो. त्यासाठी सेटिंग अॅपमध्ये आहे. सेटिंगमध्ये डेटा अँड स्टोरेज युजेस हा पर्याय आहे. तो ओपन केल्यानंतर लो डेटा युजेस असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच व्हॉटसअॅपमुळे जास्त इंटरनेट खर्च होणार नाही. WhatsApp वर चॅट करताना या चुका केल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा, नियम वाचलेत का?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Whatsapp

    पुढील बातम्या