Home /News /technology /

WhatsApp वर चॅट करताना या चुका केल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा, नियम वाचलेत का?

WhatsApp वर चॅट करताना या चुका केल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा, नियम वाचलेत का?

फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर व्हॉटसअॅपनेही युजर्ससाठी नियम सांगितले आहेत.

    व्हॉटसअॅप हे मेसेजिंग अॅप सर्वाधिक लोकप्रिय आहे. सर्वसामन्यांपासून ते बड्या लोकांपर्यंत, सर्वच क्षेत्रात या व्हॉटसअॅपचा वापर केला जातो. यावरून अल्पावधीत गोष्टी शेअर केल्या जातात. दरम्यान भारतात अनेकदा व्हॉटसअॅप सारख्या समाज माध्यमांवरून अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे हिंसाचार, जाळपोळीच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी आता सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्यामुळे समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. याआधी फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर व्हॉटसअॅपनेही युजर्ससाठी नियम सांगितले आहेत. ग्रुप अॅडमीन पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. जर एखाद्या ग्रुप मेंबरने काही बेकायदेशीर कृत्य केलं तर अॅडमीनला जबाबदार धरलं जाईल. ग्रुपमध्ये पॉर्न व्हिडिओ, यातही लहान मुलांचे व्हिडिओ, फोटो किंवा आक्षेपार्ह मजकूर शेअर होत असेल तर अॅडमिनला अटक होऊ शकते. एडिटेड, मॉर्फ केलेले व्हिडिओ शेअर करण्यासही बंदी आहे. असे व्हिडिओ ज्यामुळे एखाद्याची बदनामी होत असेल तर याचे गंभीर परिणाम अॅडमिनला भोगावे लागतील. व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये एखाद्या महिलेबाबत काही आक्षेपार्ह पोस्ट केलं किंवा त्याबद्दल महिलेने तक्रार दाखल केली तर अॅडमिनवर पोलिस कारवाई होईल. लपवून ठेवलेल्या कॅमेऱ्यात शूट केलेल्या सेक्स क्लिप्स किंवा अनधिकृतपणे आक्षेपार्ह चित्रण केलेले व्हिडिओ शेअर करणंही नियमांच्या विरोधात आहे. वाचा : तुमच्या मोबाईलमध्ये लवकरच येणार 117 नवीन Emoji हल्ली फेक अकाउंटचे प्रमाण वाढले आहे. यात एखाद्याची बदनामी करण्याच्या हेतूने संबंधित व्यक्तीच्या नावाने बनावट अकाउंट उघडण्याचे प्रकार केले जातात. दुसऱ्याच्या नावे अकाउंट उघडल्यास तुरुंगाची हवा खावी लागेल. भडकावू मेसेज, एखाद्या धर्माविरोधात काही शेअर करणंही ग्रुप अॅडमिनला अडचणीत आणू शकतं. संवेदनशील मुद्द्यांवर खोट्या बातम्या, अफवा, मल्टिमिडिया फाइल्स शेअर करणं ग्रुप अॅडमिनसह मेम्बरसाठीही धोक्याचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तस्करीसाठी व्हॉटसअॅपचा वापर केला जातो. ड्रग्ज किंवा अशा अवैध व्यवसायासाठी व्हॉटसअॅप वापरण्यावर निर्बंध आहेत. जर तुम्ही यासाठी वापर केलात तर हा गुन्हा ठरेल. वाचा : कुंपणच शेत खातंय! अँटीव्हायरस कंपनी करतेय डेटा चोरी
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Whatsapp

    पुढील बातम्या