मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Alert : तुमच्या बँकिंग व्यवहारांवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्ड होत आहेत चोरी!

Alert : तुमच्या बँकिंग व्यवहारांवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्ड होत आहेत चोरी!

ट्रोजन मालवेअर व्हायरस (Malware) ऑनलाईन बँकिंग युजर्सना आपलं शिकार बनवत असून; युजर्सची पर्सनल आणि फायनांशिअल माहिती चोरी करत आहेत.

ट्रोजन मालवेअर व्हायरस (Malware) ऑनलाईन बँकिंग युजर्सना आपलं शिकार बनवत असून; युजर्सची पर्सनल आणि फायनांशिअल माहिती चोरी करत आहेत.

ट्रोजन मालवेअर व्हायरस (Malware) ऑनलाईन बँकिंग युजर्सना आपलं शिकार बनवत असून; युजर्सची पर्सनल आणि फायनांशिअल माहिती चोरी करत आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : आज तुम्ही अनेक पेमेंट अॅप (Payment App) आणि बँकिंग अॅपवरून (Banking App) व्यवहार करू शकता. खिशात पैसे नसले की क्युआर कोड (QR Code) स्कॅन केला की, लगेच पेमेंट करता येतं. या ऑनलाईन बँकिंग ट्राझेक्शनच्या पर्यायामुळे युजर्स अगदी सहज कॅशलेस (Cash) व्यवहार करतात आणि निश्चिंतपणे घराबाहेर पडू शकतात. पण तुम्ही जरा सतर्क राहा कारण, ट्रोजन मालवेअर व्हायरस (Malware) ऑनलाईन बँकिंग युजर्सना आपलं शिकार बनवत असून; युजर्सची पर्सनल आणि फायनान्शिअल माहिती चोरी करत आहेत.

या बँकिंग ट्रोजन मालवेअर व्हायरसचं नाव Metamorfo असल्याचं सायबर सिक्युरिटी रिसर्चर्सने सांगितलं आहे. या व्हायरसने आतापर्यंत देश-विदेशातील 20हून अधिक ऑनलाईन बँक युजर्सना आपलं शिकार केलं आहे. हळूहळू हा व्हायरस पसरत असल्याचंही सांगितलं जात आहे. गेल्या महिन्यात ब्राझीलमध्ये उघड झालेल्या बँक घोटाळ्यांमुळे त्यावर बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर मालवेअरने आपली दिशा बदलली आहे.

अशी होऊ शकते तुमची फसवणूक

हॅक करण्याच्या अनेक प्रकारांपैकीच एक Metamorfo! यामध्ये तुम्हाला एक फ्रॉड मेल (fraud Mail) हॅकर (Hacker) पाठवतो. हा मेल नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर येतो, त्यामुळे तो तुम्हाला ओळखता येत नाही. यामधल्या झीप फाईल (ZIP file) महत्त्वाचे डॉक्युमेंटस् समजून तुम्ही डाऊनलोड (Download) करून घेता. फाईल एकदा डाऊनलोड झाल्यावर रन (Run) झाली की, मालवेअरला तुमच्या कॉम्प्युटरचा एक्सेस(Access) मिळतो.

हेही वाचा - सावधान! हॅकर्सने शोधून काढला नवा फंडा, तुमची फक्त एक चूक पडू शकते महागात

इन्स्टॉलेशन (installation) पूर्ण झाल्यावर मालवेअर, अँटी वायरसपासून (Anti-Virus) वाचण्यासाठी एक प्रोग्राम रन करतो. कॉम्प्युटरवर पूर्णपणे ताबा मिळाल्यावर इंटरनेट ब्राऊजरमध्ये युजरनेम आणि पासवर्ड (User Name and Password) ऑटो-फीड (auto feed) होणारे पर्याय बंद करून टाकतो. अशा वेळी युजरला ही माहिती टाईप करावी लागते. एकदा काही युजरनेम आणि पासवर्ड टाईप झाला की मालवेअर ही माहिती चोरी करून हॅकरपर्यंत पोहचवतो. आता तुमची फायनांशिअल सिक्युरिटी माहिती चुकीच्या हाती लागली असून याचा वापर झाला की तुम्हाला आर्थिक नुकसान होणार हे निश्चित!

चिंता नको, करा ही प्रक्रिया!

मालवेअरपासून दूर राहायचं असेल तर, युजर्सला बँकिंगसंबंधित येणारे ई-मेल (E-mail) आणि सोबत अटॅच फाईल्सपासून सावध राहिलं पाहिजे. शंका आल्यास आपल्या बँकेशी संपर्क साधावा. कोणत्याही संशयास्पद ईमेलमधील फाईल्स डाऊनलोड न करू नका. अँटीवायरसचा वापर अवश्य करा तसेच, पासवर्डही जरा कठीण ठेवा.

------------------

अन्य बातम्या

Google ला बनवलं उल्लू! रस्त्यावर एकटा असूनही मॅपने दाखवलं ट्राफिक जाम

WhatsApp वर चॅट करताना या चुका केल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा, नियम वाचलेत का?

First published:

Tags: Virus