Home /News /technology /

सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं

सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं

ऑनलाइन खरेदी विक्री, पेमेंट याचे प्रमाण आता वाढले आहे. यामध्ये हॅकर्स ऑनलाइन फसवणुकीसाठी वेगवेगळी शक्कल लढवतात त्यामुळे युजर्सनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

    रोख व्यवहारांपेक्षा ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण आता वाढलं आहे. यामुळे आपलं काम लवकर आणि सहज होत असलं तरी यात धोकाही आहे. ऑनलाइन खरेदी करण्यात फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वच बँकांकडून खातेदारांना सावध राहण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. बँक खात्याची माहिती, पिन कोड, पासवर्ड या गोष्टी इतर कोणाला देऊ नयेत असंही वारंवार सांगितलं जातं. कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना वायफाय वापरत असेल तर ते पासवर्ड प्रोटेक्टेड आहे की नाही याची खात्री करून घ्या. सायबर कॅफे किंवा फ्री वाय-फायच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करू नका. फिशिंग मेल युजर्सना अडकवण्यासाठी अनेकदा इमेल पाठवला जातो. त्यामुळे बँक किंवा शॉपिंग साइटवरून पाठवल्याचा समजा ग्राहकांचा होतो. त्यानंतर वैयक्तिक माहिती मागितली जाते. तसेच लिंकवर क्लिक करताच बनावट साइट ओपन होते. तुम्ही त्यात युजर आयडी आणि पासवर्ड टाकताच मोबाइल क्रमांक, लॉग इन आयडी, पासवर्ड, डेबिड-क्रेडिट कार्डची माहिती हॅक केली जाते. क्यूआर कोड फसवणूक करणारे अनेकदा व्हॉटसअॅपवर क्यूआर कोड पाठवतात. त्यासोबत मेजेसही पाठवतात की, क्यूआर कोड स्कॅन करताच तुमच्या खात्यावर पैसे येतील. क्यूआर कोडचं फीचर काही अॅप्समध्ये असतं. अशा कोणत्याही क्यूआर कोडवर कार्डचा नंबर, पिन क्रमांक किंवा ओटीपी शेअर करू नका. वाचा : तुम्ही ऑनलाइनही होऊ शकता कोरोनाचे शिकार, तुम्हालाही आलाय का असा Email? कस्टमर केअर कॉल हॅकर्स फ्रॉड करण्यासाठी तुमच्या सिमचा वापर करतात. त्यावरून ते ओटीपी घेतात. मोबाइल कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचं सांगून तुमच्याकडून सिम कार्डचा नंबर घेतला जातो. अशा प्रकारची माहिती मागितल्यास सावध रहा. स्क्रीन शेअरींग अनेकदा स्क्रीन शेअरिंग अॅपचा वापर केला जातो. त्यामुळे असे अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितलं तर करू नका. यातून तुमचा मोबाइल डेटा थर्ड पार्टीपर्यंत पोहोचवतो. Screenshare, Anydesk, Teamviewer यांसारखी अॅप्स इन्स्टॉल करू नका. वाचा : महिलेला 388 रुपयांचं नेल-पॉलिश पडलं 92,466 रुपयांना, ऑनलाइन खरेदीचा दणका पुश मेसेज लिंक याशिवाय पुश मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवली जाते. गेल्या काही दिवसांत ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना लुबाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ऑनलाइन खरेदी केल्यानंतर त्यासाठी कस्टमर केअरच्या नंबरवर कॉल केल्यानं तब्बल एक लाख रुपयांचा दणका ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज किंवा लिंक ओपन करू नका. वाचा : तुमचे पासवर्ड, डेटा सुरक्षित आहे का? चेक करा आणि नसेल तर सेटिंग बदला
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Online payment, Whatsapp

    पुढील बातम्या