नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : कार असो, बाईक असो किंवा इतर कोणतंही वाहन (Vehicle), त्याची खरेदी केल्यानंतर ते रस्त्यावर चालवण्यापूर्वी त्या वाहनाचा इन्शुरन्स (Motor Insurance) असणं कायद्याने बंधनकारक आहे. वाहनाच्या इन्शुरन्समुळे विविध प्रकारचं संरक्षण मिळतं. अपघातामुळे किंवा इतर कारणाने तुमच्या वाहनाचं कोणतंही नुकसान झालं, वाहनाची चोरी झाल्यास इन्शुरन्समुळे काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळू शकते. त्यामुळेच तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स (Vehicle Insurance) आहे ना, याची खात्री करा. तसंच त्याची मुदत संपली असेल तर तात्काळ त्याचं नूतनीकरण करा.
याशिवाय, तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर नवीन किंवा वापरलेली कोणतीही कार घेताना कारच्या इन्शुरन्स (Car Insurance) बाबत संपूर्ण माहिती मिळवा.
आज विमा क्षेत्रात अनेक प्रकारचे इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या प्रीमियमवर वेगवेगळ्या प्रकारचं संरक्षण देतात. त्यामुळे कारचा इन्शुरन्स काढताना नेहमी वेगवेगळ्या विमा कंपन्यांची तुलना करा. यामुळे तुम्हाला याचा अंदाज येईल की, जो इन्शुरन्स प्लॅन तुम्ही घेत आहेत, त्याअंतर्गत तुम्हाला आणि तुमच्या कारला कशा प्रकारे विमा संरक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळेच कारचा इन्शुरन्स काढण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.
इन्शुरन्स प्लॅनची तुलना करा -
अनेक कंपन्या विमा क्षेत्रात काम करत असून त्यांच्याकडून विविध इन्शुरन्स पॉलिसी ऑफर केल्या जातात. त्यामुळे कोणती विमा कंपनी कोणत्या प्रीमियममध्ये कोणती सुविधा देत आहे, हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसींचे प्रीमियम आणि संरक्षण कवच यांची तुलना करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नसेल तर तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या कारचा इन्शुरन्स काढता येईल.
इन्शुरन्स क्लेमबाबत माहिती घ्या -
कार इन्शुरन्समधील प्रीमियमसोबतच संरक्षणाबाबतही सखोल अभ्यास केला पाहिजे. कारण कोणत्याही वाहनाच्या विम्यामध्ये काही गोष्टी पूर्णपणे कव्हर केल्या जातात आणि काही कमी प्रमाणात, तर काही गोष्टींचा इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. कारण जेव्हा तुम्ही क्लेम घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला नियमानुसार कमी कव्हरेज मिळतं. यामुळे वाद निर्माण होतात.
जर तुम्ही कारमध्ये सजावटीसाठी आणि सोयीसाठी काही अॅक्सेसरीज स्वतंत्रपणे बसवल्या असतील, तर त्यासाठी कार इन्शुरन्समध्ये कोणतंही सुरक्षा कवच नाही. यासाठी तुम्हाला वेगळा इन्शुरन्स घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या कारमध्ये वेगळं म्युझिक सिस्टम बसवणार असाल, तेव्हा त्यासाठी वेगळा इन्शुरन्स घ्या.
तुम्हाला काय कव्हरेज मिळतं?
भारतातील आघाडीची जनरल विमा कंपनी इफ्को टोकियो (IFFCO Tokyo) कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये खालील परिस्थितीमध्येच विमा संरक्षण देते -
- आग, स्फोट किंवा कारने स्वतः पेट घेणे, अशा परिस्थिती विमा संरक्षण मिळतं.
- पूर, वादळ, चक्रीवादळ, हिमवादळ, वीज, भूकंप, भूस्खलन, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीपासून विमा संरक्षण मिळतं.
-घरफोडी, चोरी, दंगल, संप, दुर्भावनापूर्ण किंवा दहशतवादी कारवाई, रस्ता, रेल्वे, जलमार्ग आदींमुळे नुकसान झाल्यास.
- सार्वजनिक ठिकाणी विमा उतरवलेल्या वाहनामुळे एखाद्या व्यक्तीला दुखापत किंवा मृत्यू झाल्यास, तसंच मालमत्तेचं नुकसान झाल्यास साडेसात लाख रुपयांपर्यंत कायदेशीर नुकसान भरपाई मिळते. यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम (व्याजासह), दावेदाराचा खर्च (देय असल्यास) आणि संरक्षण खर्च (विमाकर्त्याच्या सहमतीने)
- विमा उतरवलेल्या वाहनाच्या वाहनचालकासाठी 2,00,000 चं वैयक्तिक अपघात संरक्षण. ही रक्कम संबंधित वाहनात बसताना किंवा प्रवास करताना अपघात झाल्यास, व या अपघातात मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.