मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp च्या या फीचरचा हॅकर्सकडून होतोय गैरवापर, ही एक चूक पडेल महागात

WhatsApp च्या या फीचरचा हॅकर्सकडून होतोय गैरवापर, ही एक चूक पडेल महागात

WhatsApp चा सर्वाधिक वापर होत असल्याने विविध फ्रॉडही यावरुन होत आहेत. WhatsApp वर सध्या असा एक स्कॅम होत असून युजरला एक चूक महागात पडू शकते.

WhatsApp चा सर्वाधिक वापर होत असल्याने विविध फ्रॉडही यावरुन होत आहेत. WhatsApp वर सध्या असा एक स्कॅम होत असून युजरला एक चूक महागात पडू शकते.

WhatsApp चा सर्वाधिक वापर होत असल्याने विविध फ्रॉडही यावरुन होत आहेत. WhatsApp वर सध्या असा एक स्कॅम होत असून युजरला एक चूक महागात पडू शकते.

नवी दिल्ली, 25 एप्रिल : इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंगमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी दुसरीकडे मात्र यामुळे काही धोकेही निर्माण झाले आहेत. ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) आणि सायबर स्कॅम्स (Cyber Scams) हे सर्वात मोठे धोके असून युजरकडून झालेली लहानशी चूक त्यांचं मोठं नुकसान करू शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. या एकाच प्लॅटफॉर्म फोटो, व्हिडीओ, ऑडिओ कॉल, व्हिडीओ कॉल, पेमेंट, फाइल शेअरिंग अशा अनेक गोष्टी मिळत असल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशात याचा सर्वाधिक वापर होत असल्याने विविध फ्रॉडही यावरुन होत आहेत. WhatsApp वर सध्या असा एक स्कॅम होत असून युजरला एक चूक महागात पडू शकते.

काही दिवसांपूर्वी WhatsApp ने एक नवं फीचर लाँच केलं होतं. यात UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता याच फीचरचा फायदा घेत हॅकर्स लोकांची फसवणूक करत आहेत. WhatsApp Payments साठी वापरल्या जाणाऱ्या क्यूआर कोडच्या मदतीने पैसे चोरी केले जात असल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. या क्यूआर कोड स्कॅमच्या (QR Code Scam) जाळ्यात कोणीही अडकू शकतं.

एखाद्याकडून पैसे घेण्यासाठी कधीही क्यूआर कोड स्कॅन करावा लागत नाही. पण हॅकर्स युजरला पैसे पाठवण्याच्या नावाखाली क्यूआर कोड स्कॅन करण्याची मागणी करतात. त्यानंतर युजरच्या फोनचे डिटेल्स मिळवतात आणि मोठी फसवणूक केली जाते. त्यामुळे कधीही कोणी पैसे तुम्हाला पाठवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचं सांगितल्यास सावध व्हा. केवळ आपण दुसऱ्याला पैसे पाठवताना कोड स्कॅन करावा लागतो.

हे वाचा - फोन, ATM PIN कसा हॅक होतो? पासवर्ड ठेवण्याच्या पद्धतीबाबत धक्कादायक खुलासे

पेमेंट करताना कधीही ज्या यूपीआय आयडीला पैसे पाठवत आहात, तो पुन्हा तपासा. अनेकदा असंही होतं फ्रॉडस्टर WhatsApp वर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यासाठी सांगतात. त्यामुळे कोणीही कोड स्कॅनबाबत सांगितल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

WhatsApp वर विना नंबर तुम्ही क्यूआर कोड्सद्वारेही तुमचं प्रोफाइल शेअर करू शकता. अशात तुमच्या प्रोफाइलचा क्यूआर कोड कोणासोबत शेअर करता हे तपासणं गरजेचं आहे. एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडे हा कोड गेला तर तो तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकेल आणि त्यानंतर फसवणूक होऊ शकते.

First published:

Tags: QR code payment, Tech news, Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp pay, WhatsApp user