मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /फोन, ATM PIN कसा हॅक होतो? पासवर्ड ठेवण्याच्या पद्धतीबाबत धक्कादायक खुलासे

फोन, ATM PIN कसा हॅक होतो? पासवर्ड ठेवण्याच्या पद्धतीबाबत धक्कादायक खुलासे

Passwords

Passwords

2022 मधील सर्वात वीक पासवर्ड रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये लोकांच्या पासवर्ड ठेवण्याच्या पद्धतीबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 25 एप्रिल : मोबाइल सिक्योरिटी किंवा सोशल मीडिया अकाउंट यापैकी कोणतीही गोष्ट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा (Password) वापर केला जातो. जर एखाद्या चुकीने तुमचा पासवर्ड लीक झाला तर? 2022 मधील सर्वात वीक पासवर्ड रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये लोकांच्या पासवर्ड ठेवण्याच्या पद्धतीबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

गुगल पे, एटीएम, सोशल मीडिया, ऑफिस मेल, जीमेल अशा अनेक गोष्टींसाठी पासवर्ड ठेवण्याची गरज असते. अनेकदा हे पासवर्ड्स काही-काही दिवसांनी अपडेटही करावे लागतात. वेळोवेळी पासवर्ड्स बदलणं ही चांगली सवय आहे. पण अनेक जण जुन्या पासवर्ड्समध्ये अगदी हलके बदल करुन पुन्हा जवळपास तसेच जुने पासवर्ड्स ठेवतात. त्यांचे पासवर्ड्स जुने पॅटर्स किंवा कॉमन थीमवर आधारित असतात.

Weak Password Report -

स्वीडनमधील पासवर्ड मॅनेजमेंट आणि ऑथेंटिकेशन सॉल्यूशन वेंडर Specops Software च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, ब्रूट फोर्स अटॅक अर्थात हा हॅकिंगचा हा एक प्रकार आहे. या हॅकिंगमध्ये वापरले जाणारे 93 टक्के पासवर्डमध्ये 8 किंवा त्याहून अधिक कॅरेक्टर असतात. 54 टक्के ऑर्गेनायझेशनकडे वर्ड पासवर्ड मॅनेज करण्यासाठी कोणतंही टूल नाही. 42 टक्के सीजनल पासवर्डमध्ये Summer शब्द आढळला आहे.

Brute Force Attack, Shoulder Surfing आणि Social Engineering हॅकिंगच्या काही पद्धती आहेत, ज्याच्या मदतीने सायबर अटॅक, पासवर्ड हॅक केले जातात. याच पद्धतींनी हॅकर्स पासवर्ड्सचीही ओळख करतात.

हे वाचा - ALERT! लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन्स धोक्यात, हॅकर्सकडून मीडिया फाइल्सचा आधार

Shoulder surfing द्वारे ATM पीनची चोरी केली जाते. काही वेळा हॅकर्स मालवेयरच्या मदतीने युजरचे क्रेडेंशियल्स चोरी करतात. त्या क्रेडेंशियल्सच्या आधारे पासवर्ड्सचा अंदाज घेतात आणि ते क्रॅक करतात. Social Engineering या हॅकिंगद्वारे हॅकर्स एक खोटी वेबसाइट बनवतात. त्या खोट्या साइटवर युजरने आपले क्रेडेंशियल्स टाकल्यानंतर पासवर्ड हॅकर्सला मिळतात. या वेबसाइट दिसायला खऱ्या वेबसाइटप्रमाणे असतात. त्यामुळे युजरला कोणताही संशय येत नाही आणि खरी वेबसाइट समजून पासवर्ड टाकले जातात आणि ते हॅकरपर्यंत पोहोचतात.

First published:
top videos

    Tags: Hacking, Password, Tech news