नवी दिल्ली, 16 एप्रिल : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्सला अधिक सुविधा देण्यासाठी सतत आपल्या अॅपमध्ये अपडेट देत असतं. WhatsApp ने मागील काही माहिन्यात अनेक नवे फीचर्स लाँच केले असून आता WhatsApp ने आणखी एक फीचर आणलं आहे. आता व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं असून त्यात कम्युनिटि्ज फीचर आणि ग्रुप कॉलमध्ये अधिक लोकांना जोडण्याची सुविधा दिली आहे.
Meta चे प्रमुख मार्क जुकरबर्ग यांनी (Mark Zukerburg) आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नव्या फीचर्सबाबत माहिती दिली आहे. त्यांनी Communities Feature चं ट्रायल सुरू केल्याची माहिती दिली. यामुळे सर्व चॅट ग्रुप मॅनेज करणं आणि माहिती शोधण्यास मदत होते.
मार्क जुकरबर्ग यांनी (Mark Zukerburg) आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आम्ही ऑनलाइन संवादाच्या पद्धतीत बदल करत आहोत. अनेकजण मनोरंजक सामग्री शोधण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी सोशल नेटवर्क्स फीड्स वापरतात. आम्ही पुढील अपडेट तयार करण्यावरही काम करत आहोत. गोपनीयता, सुरक्षिततेवर लक्षकेंद्रित करुन व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरवर व्हिडीओ चॅट, व्हॉइस मेसेज, स्टेटस, पेमेंटसारखे फीचर्स जोडले आहेत.
आता WhatsApp ने माहिती मिळवणं अधिक सोपं जावं यासाठी ग्रुप तयार केले असून यामुळे युजर्स एका वेळी अनेकांना एकाच ग्रुपमध्ये एकत्र आणण्यास सक्षम असेल. यामध्ये स्कूल ग्रुप, बिजनेस ग्रुप, ऑफिस ग्रुप आपल्यानुसार ऑर्गेनाइज, मॅनेज करण्यास मदत मिळेल. ऑनलाइन स्टडी किंवा वर्क फ्रॉमदरम्यान वेगवेगळे ग्रुप बनवण्याची गरज पडते. परंतु आता नव्या फीचरच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुप्सला एका कम्युनिटीमध्ये आणता येऊ शकतं.
ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये जोडता येणार 32 लोक -
WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये एकावेळी 32 लोकांना जोडण्यास आणि दोन गीगाबाइटपर्यंतची फाइल शेअर करण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. सध्या ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये एकावेळी 8 लोकांना जोडता येतं आणि एक जीबीपर्यंतची फाइल शेअर करता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.