नवी दिल्ली, 13 एप्रिल : मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग (Electric Scooter Fire) लागल्याच्या आनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा इलेक्ट्रिक स्कूटमध्ये आगीची सर्वात मोठी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये जितेंद्र इलेक्ट्रिक व्हीकल नावाच्या कंपनीच्या 20 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये आग लागली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जितेंद्र ईव्हीच्या स्कूटर्स एका कंटेनरमध्ये भरुन घेऊन जात होते. पण अचानक कंटेनरच्या वरच्या डेकमध्ये ठेवलेल्या स्कूटरमध्ये आग लागली. कंटेनरमध्ये एकूण 40 स्कूटर होत्या. त्यापैकी 20 स्कूटरमध्ये आग लागली. आग अतिशय भीषण होती. परंतु यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. अद्याप आगीचं कारण समजू शकलेलं नाही. मागील एका महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याची ही पाचवी घटना आहे. याआधी एका ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि ओकिनावा इलेक्ट्रिक बाइकमध्ये आग लागली होती. तमिळनाडूतील वेल्लोरमध्ये एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. सरकारने ओला आणि ओकिनावा कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये आग लागल्याच्या कारणांचं उत्तर मागितलं आहे.
हे वाचा - Electric Scooter मध्ये आग लागल्यानंतर एक्सपर्टचा मोठा इशारा, काय होतं आगीचं कारण
काय असू शकतं कारण - ऑटो एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनल कंब्शन इंजिन-ICE वाहनांमध्ये आग लागल्याचा अधिक धोका असतो. या वाहनांमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरीमुळे आग अधिक भीषण लागू शकते. तसंच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागलेली आग विझवणं अधिक कठिण असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे.
It started out as random & sporadic but now cases of #ElectricVehicles on fire are surfacing with increasing frequency. Just as I had feared.
— Sumant Banerji (@sumantbanerji) April 11, 2022
Last Saturday, 20 #electricscooters from #JitendraEV were gutted near Nashik in a trailer.
It'll get worse before it gets better.#EV pic.twitter.com/2G5ZFXqBfn
तसंच स्कूटरच्या निर्मितीवेळी काही कमी राहिल्यास, एक्सटर्नल डॅमेज किंवा खराब सॉफ्टवेअर हेदेखील आगीचं कारण असू शकतं. खराब झालेल्या किंवा डॅमेज सेलमध्ये अधिक हीट निर्माण होते. याला थर्मल रनवे म्हटलं जातं. यात एका सेलमध्ये निर्माण झालेली हीट दुसऱ्या सेलमध्ये पोहोचते. यामुळे चेन रिअॅक्शन बनतं आणि आग लागू शकते.